» Icc Women World Cup : New Zeland And England's Match At Mumbai

आयसीसी महिला विश्वचषक : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात मुंबई येथे होणार सामना

वृत्तसंस्था | Feb 15, 2013, 03:10 AM IST

  • आयसीसी महिला विश्वचषक : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात मुंबई येथे होणार सामना

मुंबई - आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमधून बाहेर पडलेल्या गतविजेत्या इंग्लंडची नजर न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणा-या लढतीत तिसरे स्थान मिळवण्यावर असेल. बुधवारी इंग्लंडने आपल्या शेवटच्या सुपरसिक्स लढतीत न्यूझीलंडला 15 धावांनी पराभूत केले होते. दोन्ही टीम आता तिस-या स्थानासाठी समोरासमोर येणार आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका व श्रीलंका महिला टीममध्ये पाचव्या स्थानासाठी खेळणार आहे. हा सामना कटक येथे होईल.

ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजच्या महिला संघात वर्ल्डकपची फायनल रविवारी ब्रेबॉर्नवर होईल. यजमान भारताने पाकला हरवून सातवे स्थान पटकावले. शेवटच्या सुपरसिक्स लढतीत इंग्लंडने विकेटकिपर सारा टेलरच्या (88) शानदार खेळीच्या बळावर सहा गडी गमावून 266 धावांचा मजबूत स्कोअर केला होता.

Next Article

Recommended