आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला टी-20 : भारतीय महिलांसमोर आज इंग्लंडचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तसंस्था । सिलहट
महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतासमोर बुधवारी इंग्लंडचे तगडे आव्हान असेल. भारतीय महिला संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी ब गटात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर 22 धावांनी मात केली.
आता मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ महिला वर्ल्डकपमध्ये विजयी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करणार आहे. सलामी सामन्यात शिखा पांडेला समाधानकारक कामगिरी करता आली. मात्र, कर्णधार मिताली, झुलन गोस्वामी, पूनम राऊत आणि स्मृती मनधनाने सपशेल निराशा केली. त्यामुळे भारताला श्रीलंकेने विजयासाठी दिलेले लक्ष्य गाठता आले नाही. परिणामी या टीमला हातचा सामना गमवावा लागला.

भारतीय महिला संघाला वजयासह उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा कायम ठेवता येतील. मात्र, सलग दुसर्‍या लढतीतील पराभवाने भारताचे अंतिम चारमधील प्रवेशाचे स्वप्न भंग होणार आहे. आता भारतीय महिला संघाला धोनीच्या टीम इंडियाने केलेल्या कामगिरीतून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.

तसेच सलामीच्या सामन्यात इंग्लंडला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारताप्रमाणेच इंग्लंडलाही अंतिम चारमधील प्रवेशासाठी विजयाशिवाय गत्यंतर नाही.

दुसरीकडे बांगलादेश आणि वेस्ट इंडीज यांच्यात सामना रंगणार आहे. विंडीजने सलामी सामना जिंकून स्पर्धेत दमदार सुरुवात केली. या विजयाची लय दुसर्‍या सामन्यातही कायम ठेवण्याचा विंडीजचा प्रयत्न असेल.