आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला टी-20 : ऑस्ट्रेलियाची आफ्रिकेवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिलहट - दोन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलिया महिला संघाने आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये शानदार विजय मिळवला. या टीमने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेवर सहा गड्यांनी मात केली. एलीस पैरीच्या (नाबाद 41) धडाकेबाज खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 9 बाद 114 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाचा हा स्पर्धेतील पहिला विजय ठरला. सलामी सामन्यात ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडने पराभूत केले होते. या पराभवातून सावरलेला ऑस्ट्रेलिया संघ आता विजयी ट्रॅकवर आला आहे. धावांचा पाठलाग करणार्‍या ऑस्ट्रेलियाकडून पैरी आणि जैस कॅमरून (नाबाद 27) यांनी अभेद्य 60 धावांची भागीदारी केली. यासह ऑस्ट्रेलियाने आपला विजय निश्चित केला.