आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला क्रिकेटला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात अर्धी लोकसंख्या महिलांची आहे. तरीही महिला क्रिकेटला ते महत्त्व मिळालेले नाही, ज्याच्यावर त्यांचा हक्क आहे. महिला क्रिकेटला सहकार्य आणि आपसातील सामंजस्याची गरज आहे, सहानुभूतीची नाही. माजी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू डायना इडुलजी हिच्या या मताशी मी सहमत आहे. मुंबईत महिला वर्ल्डकपचे दोन सामने पाहिल्यानंतर इडुलजी योग्य बोलत असल्याचे मलाही जाणवले. महिला क्रिकेटबद्दल सहजपणे सहानुभूती व्यक्त केली जाऊ शकते.

वर्ल्डकपसारख्या मोठय़ा स्पध्रेला स्टेडियम रिकामे आहे. मीडियाचेसुद्धा विशेष लक्ष नाही. आपला हा व्यवहार भेदभावपूर्ण आहे. अशा परिस्थितीत मग महिला क्रिकेटची प्रगती कशी होईल ? इडुलजी महिला क्रिकेटची शान आहे. तिने यापूर्वी देशासाठी शानदार कामगिरी केली आहे. इडुलजीला देशात होणारे वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नाही, याचे अधिक आश्चर्य आहे. सुनील गावसकर यांची कधी उपेक्षा केली जाऊ शकते काय ? नाही ना. मग इडुलजी महिला क्रिकेटपटू आहे म्हणून आयोजकांनी तिला महत्त्व दिले नाही, हे योग्य आहे काय ?.महिला सुपरस्टारची उपेक्षा होत असेल तर इतर माजी महिला क्रिकेट खेळाडूंना बोलावण्याचा प्रo्नच निर्माण होत नाही. महिला क्रिकेट खेळाडूसुद्धा देशासाठी खेळतात. मग लैंगिक आधारावर भेदभाव का ? पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत समाजात त्यांना सन्मान मिळालेला नाही म्हणून हा भेदभाव योग्य नाही.

महिला क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी अ.भा. महिला क्रिकेट फेडरेशनचे बीसीसीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते. महिला क्रिकेटला अधिकाधिक एक्स्पोजर आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न असले पाहिजेत. माजी महिला क्रिकेटपटूंची उपेक्षा कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, याकडे तरी बीसीसीआयने लक्ष द्यायला हवे. इडुलजी एका निमंत्रणाचीसुद्धा लायक नव्हती काय. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना मिळणार्‍या रकमेचा प्रo्न आहे तेथे, कसलाच शॉर्टकट असू शकत नाही. महिला क्रिकेटला अजून प्रदीर्घ रस्ता पार करायचा आहे. टेनिसमध्ये महिलांना पुरुषांच्या तुलनेत समान रक्कम मिळते. कारण महिला टेनिसपटूंनी या खेळात पुरुषांच्या बरोबरीने प्रगती केली आहे.

मुंबईत भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजला 105 धावांनी नमवले. मिताली राजच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली. भारतीय महिला खेळाडूंना संपूर्ण स्पध्रेत खेळण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाणार आहेत, हे ऐकून सर्वांना नवल वाटेल. दुसरीकडे भारतीय पुरुष क्रिकेटपटूंना प्रत्येक वनडेसाठी चार लाख रुपये मिळतात. जागतिक मुक्त बाजार व्यवस्थेमुळे कदाचित असे होत असावे. मात्र, ही काही आदर्श स्थिती नाही. अखेर महिला किती दिवस पैशांबाबत मागे राहतील. त्यांना सन्मानजनक रक्कम मिळणे आणि प्रयत्न होणे गरजेचे आहे.

अखेर महिला क्रिकेटसाठी काय केले जाऊ शकते ? माझ्या मते खेळाडूंना मिळणार्‍या रकमेत वाढ झाली पाहिजे. त्यांची बक्षीस रक्कमही वाढवली जावी. सोबत त्यांना इतर सुविधासुद्धा सन्मानजनक पद्धतीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. खेळाने आता व्यावसायिक रूप धारण केले आहेच तर मग महिला क्रिकेटपटूंना याचा लाभ झालाच पाहिजे. महिला क्रिकेटला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुरुष व महिला क्रिकेटपटूंची डबल विकेट क्रिकेट स्पर्धा खेळवली पाहिजे. यात एक पुरुष आणि एक महिला खेळाडू असावेत. उदाहरण म्हणून समजा महेंद्रसिंग धोनीसोबत मिताली राजला पार्टनर बनवले जावे. याचप्रमाणे विराट कोहलीची पार्टनर इंग्लंड किंवा आणखी एखाद्या देशाची महिला खेळाडू असावी. या महिला खेळाडू पुरुषांसोबत खेळतील, त्या वेळी त्यांच्या खेळाचा दर्जा सुधारेल आणि त्यांना अधिक रक्कमसुद्धा मिळेल. प्रारंभिक सूचना तर हीच आहे की महिला क्रिकेटची मार्केटिंग योजनाबद्ध पद्धतीने केली पाहिजे. अशा परिस्थितीत स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही. '