आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Women's World Cup: Buoyant India Take On England In 2nd Game

महिला वर्ल्डकप क्रिकेट : आज गाठ इंग्लंडशी..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पध्रेत रविवारी भारत-इंग्लंड यांच्यात सामना रंगणार आहे. अ गटातील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 105 धावांनी नमवले होते. दुसरीकडे इंग्लंडला याच गटात र्शीलंकेकडून अखेरच्या चेंडूवर एका विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता भारताने इंग्लंडवर विजय मिळवल्यास सुपर सिक्समधील आपले स्थान निश्चित होईल. अशा परिस्थितीत गतचॅम्पियन इंग्लंड समोरील अडचणी वाढतील. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात खेळाच्या सर्व विभागात शानदार कामगिरी केली होती. भारताने त्या लढतीत 284 धावा काढल्या. वर्ल्डकपच्या इतिहासात भारताचा हा सर्वर्शेष्ठ स्कोअर ठरला होता. यानंतर कॅरेबियन टीमला 179 धावांत गुंडाळले.

कामिनीवर असेल लक्ष

भारत-इंग्लंड सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा सलामीवीर तिरुष कामिनीवर असतील. तिने वेस्ट इंडीजविरुद्ध 100 धावा काढून वर्ल्डकपमध्ये पहिली शतकधारी भारतीय होण्याचा मान मिळवला होता. कामिनीशिवाय भारताची दुसरी सलामीवीर पूनम राऊतनेही शानदार 72 धावा काढल्या होत्या. झुलन गोस्वामी आणि हरमनप्रीत कौरसुद्धा चांगल्या फॉर्मात आहेत. खूप काही करण्यासाठी कर्णधार मिताली राजकडे पहिल्या सामन्यात वेळच नव्हता. यामुळे ती आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आली होती. गोलंदाजीत झुलन, नागार्जून निरंजना आणि गौहर सुल्ताना यांचे प्रदर्शन दमदार होते. मात्र, आता त्यांच्यासमोर इंग्लिश फलंदाजांचे आव्हान असेल. इंग्लिश टीम केव्हाही दज्रेदार कामगिरी करू शकते. भारताकडून कर्णधार मिताली राजकडून मोठय़ा खेळीची आशा असेल. मिताली तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकते.

कर्णधार चालरेटचा फॉर्म चिंतेचा विषय - इंग्लंडकडून मागच्या सामन्यात हिथर नाइटने 38, जेनी गुनने 52 आणि एमी जोंसने 41 धावा काढल्या होत्या. सलामीवीर आणि कर्णधार चालरेट एडवर्ड्स फॉर्मात येणे इंग्लंडसाठी आवश्यक आहे. र्शीलंकेविरुद्ध ती 9 धावांवर धावबाद झाली होती. टॉप ऑर्डरमध्ये डॅनियल व्हाइट आणि लिडिया ग्रीनवे यांच्याकडूनही संघाला मोठय़ा खेळीची आशा असेल. इंग्लंडच्या गोलंदाजांकडून चांगली कामगिरी होणे आवश्यक आहे. कॅथरीन ब्रंट, जॉजिर्या एल्विस आणि एरन ब्रिंडल भारतीय फलंदाजांसमोर अडचणी निर्माण करू शकतात. इंग्लंडसाठी ही लढत करा किंवा मराच्या स्थितीसारखी असेल.