आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला टी-20 वर्ल्डकप : भारतीय महिलांची लंकेशी झुंज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिलहट - मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत दमदार विजयाने सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका महिला संघ सोमवारी समोरासमोर असतील. ब गटातील या सामन्याला हा सांय. 7 वाजेला सुरुवात होईल.

भारताने नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात समिश्र कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारताने दुसर्‍या सराव सामन्यात आयर्लंडला नमवले. त्यामुळे आता मुख्य फेरीत उल्लेखनीय कामगिरी करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. मिताली राज, पूनम राऊत, शिखा पांडेकडून मोठ्या खेळीची आशा आहे. याशिवाय गोस्वामी, पूनम यादवही मॅच विनर आहेत.

इंग्लंड-विंडीज समोरासमोर
इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या महिलांतही सामना रंगणार आहे. दुपारी 3 वाजता या सामन्याला प्रारंभ होईल. दोन्ही संघ या सामन्यात विजयी सुरुवात करण्यावर जोर देतील.

न्यूझीलंड महिलांनी ऑस्ट्रेलियाला हरवले
सुझी बेटसच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी शानदार विजयी सलामी दिली. या संघाने लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 7 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 गडी गमावून 128 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 121 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून हेर्लीने केलेली 41 धावांची खेळी व्यर्थ ठरली.