आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC World Cup Warm up Match: Afghanistan V India Live Match At Adelaide

तब्‍बल दोन महिन्‍यानंतर टीम इंडियाने चाखली विजयाची चव, अफगानिस्‍तानवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाने तब्‍बल दोन महिन्‍यानंतर दुबळ्या अफगानिस्‍तानला विश्‍वचषकाच्‍या दुस-या सराव सामन्‍यात पराभूत करत विजयाची चव चाखली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 364 धावा केल्‍या. प्रत्‍युत्‍तरादाखल अफगानिस्‍तान संघाने 50 षटकात 8 विकेटच्‍या मोबदल्‍यात 211 धावांपर्यंत मजल मारली. अफगानिस्‍तानवर भारताने 153 धावांनी विजय मिळविला.
या विजयासह भारतीय खेळाडूंचा पराभवाचा दुष्‍काळ संपला. आता विश्‍वचषकात 15 फेब्रुवारी रोजी होणा-या पहिल्‍या वहिल्‍या सामन्‍यात भारत पारंपरिक प्रतिस्‍पर्धी पाकिस्‍तानला पराभूत करेल का ? याकडे सर्वांच्‍या नजरा लागल्‍या आहेत.
तत्‍पूर्वी भारताने 5 खेळाडूंच्‍या मोबदल्‍यात 50 षटकांच्‍या समाप्‍तीनंतर 364 धावा केल्‍या आहेत. अजिंक्य रहाणे(88) आणि रवींद्र जडेजा (11) धावसंख्‍येवर नाबाद राहिले.
रोहितची झुंजार खेळी
भारताचा सलामीवीर रोहित शर्माला आज सुर गवसला. त्‍याने अफगाणिस्‍तानच्‍या गोलंदाजांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. त्‍याने 122 चेडूंचा सामना करताना 150 धावांची दमदार खेळी केली. त्‍यात 12 चौकार तर 7 उत्‍तुंग षटकारांचा समावेश आहे.
रैना बरसे, झळकावले अर्धशतक
सुरेश रैनाने रोहित शर्माचा चांगली सात दिली. त्‍याने 71 चेंडूंचा सामना करताना 71 धावा केल्‍या. त्‍याच पाच चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे.
अफगाणिस्‍तानची भेदक गोलंदाजी
अफगाणिस्‍ताच्‍या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली आहे. हमीद हसन आणि दौलत झरदान यांनी सलामीच्‍या शिखर धवन आणि विाट कोहलीलचा स्‍वस्‍तात तंबूची वाट दाखविली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या टीम इंडियाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. अफगाणविरुद्ध हा विजयाचा दुष्काळ संपेल, अशी आशा आहे.
फॉर्म परत मिळवण्याची संधी :
अफगाणिस्तानविरुद्ध लढतीने टीम इंडियाचा तसा फार फायदा होणार नाही. मात्र, काही फलंदाज आणि गोलंदाजांना आपला फॉर्म परत मिळवण्याची चांगली संधी असेल. गेल्या काही सामन्यांपासून शिखर धवन लयीत नाही. शिवाय मधल्या फळीत विराट कोहली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, कर्णधार धोनी, स्टुअर्ट बिन्नी यांना आपला फॉर्म तपासता येईल.
गोलंदाजी ही आपली दुबळी बाजू आहे. भुवनेश्वर कुमार, मो. शमी, अश्विन, उमेश यादव, मोहित शर्मा या लढतीत फॉर्म परत मिळवून विश्वचषकासाठी तयार होतील, अशी आशा आहे.
उभय संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, मोहित शर्मा, मो. शमी.
अफगाणिस्तान : मो. नबी (कर्णधार), अफसर झझाई, अाफताब आलम, असगर सांताझाई, दौलत झरदान, गुलबदीन नबी, हमीद हसन, जावेद अहमदी, मिरवसी अश्रफ, नजिबुल्ला झरदान, शमिउल्ला शेनवरी.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यातील रोमांचक क्षण, विश्‍वचषकाचे वेळापत्रक..