आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC World Cup Warm up Matche: England V Pakistan At Sydney

सराव सामना : पाकिस्‍तानची भेदक गोलंदाजी, इंग्‍लंडला 250 धावांत रोखले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषक 2015 च्‍या सराव सामन्‍यात पाकिस्‍तान विरुध्‍द इंग्‍लंड यांचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु आहे. इंग्‍लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
इंग्‍लंडने 8 खेळाडूंच्‍या मोबदल्‍यात 50 षटकांच्‍या समाप्‍तीनंतर 250 धावा केल्‍या आहेत. जेम्‍स ट्रेडवेल (1) आणि जॉर्डन (31) धावांवर नाबाद राहिले.
गॅरीचे अर्धशतक
सलामीवीर फलंदाज स्‍वस्‍तात बाद झाल्‍यांनतर इंग्‍लंडची नौका गॅरी बॅलेंस अाणि जो रुट यांनी सांभाळली. गॅरीने 75 चेंडुंचा सामना करताना 52 धवा केल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये 4 खणखणीत चौकारांचा समावेश आहे.
पाकिस्‍तनाच्‍या शाहीद आफ्रीदी आणि आदिलने इंग्लंडच्‍या सलामीवीरांना स्‍वस्‍तात तंबूत पाठविले.
पाकिस्‍ताने बांगलादेश विरुध्‍दचा पहिला सराव सामना जिंकला आहे. हीच विजयी लय कायम ठेवण्‍याची पाकिस्‍तानची इच्‍छा असेल. आज(11 फेब्रुवारी) पाकिस्‍तान इंग्‍लंडला धुळ चारण्‍याच्‍या इराद्याने मैदानात उतरले आहे. 14 ही संघामध्‍ये सराव सामने सुरु अाहेत. उद्या शेवटचे सराव सामने होतील.
उभय संघ
पाकिस्‍तान

अहमद शेहजाद , युनुस खान, मिस्‍बाह-उल- हक( कर्णधार), सोहिब मकसूद, सोहेल, उमर अकमल, शाहिद आफ्रिदी, वहाब रईज, यासिर शाह, इहसान आदिल, सोहेल खान
इंग्‍लंड
अॅलेक्‍स हेल्‍स, इऑन मॉर्गन, गॅरी बॅलेंन्‍स, इऑन बेल, जेम्‍स टेलर, जो रुट, मोईन अली, रवी बोपारा, जोस बटलर, ख्रिस जॉर्डन , जेम्‍स अँडसन, जेम्‍स ट्रेडवेल, स्टिव्‍हन फिन, स्‍टुअर्ट ब्रॉड
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यातील क्षणचित्रे.. विश्‍वचषकाचे वेळापत्रक..