आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC World T20: Minnows Netherlands Run South Africa Close In Thrilling Match

आफ्रिकेची शिकार होता होता राहिली; दुबळ्या हॉलंडवर अवघ्या 6 धावांनी मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितगाव - द. आफ्रिकेसारख्या मजबूत संघाचा पराभव थोडक्याने टळला. पात्रता फेरीतील दुबळा संघ हॉलंडने जबरदस्त साहसिक खेळ करीत आफ्रिकेला घाम फोडला होता. मोठय़ा स्पध्रेत नेहमीच अपयशी ठरणार्‍या आफ्रिकेने हा सामना कसाबसा वाचवला. टी-20 वर्ल्डकपच्या रोमांचक सामन्यात आफ्रिकेने हॉलंडवर 6 धावांनी निसटता विजय मिळवला. चार बळी घेणारा इम्रान ताहिर सामनावीर ठरला.

हॉलंडने द. आफ्रिकेला 9 बाद 145 धावांवर रोखले. हॉलंडची स्थिती एकवेळ 4 बाद 116 धावा अशी चांगली होती. मात्र, नवख्या हॉलंडचा डाव अवघ्या 18.4 षटकांत 139 धावांत आटोपला. सलामीवीर माईबर्गने 51 धावा काढून आपल्या संघाला विजयासमीप पोहोचवले. द. आफ्रिकेचा गोलंदाज बोरेन हेनड्रिक्सने डेर गुगटनला (8) बाद करून हॉलंडचा डाव गुंडाळला. याच हॉलंडला श्रीलंकेने पहिल्या सामन्यात 39 धावांत गुंडाळले होते. संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका : 9 बाद 145. हॉलंड: सर्वबाद 139.