आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC World Twenty20: South Africa Edge Two run Victory Over New Zealand

आफ्रिकेचा रोमांचक विजय;न्यूझीलंडचा 2 धावांनी पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितगाव - दक्षिण आफ्रिका संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी न्यूझीलंडचा 2 धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकात डेल स्टेनने (4/17) केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर आफ्रिकेने रोमांचक विजय मिळवला.

न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या षटकांत सात धावांची आवश्यकता होती. मात्र, आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज डेल स्टेनने पहिल्या आणि पाचव्या चेंडूवर ल्यूक रोंची व एन. मॅक्लुमला बाद करून सामन्याला कलाटणी दिली. शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयासाठी 3 धावांची गरज असतानाच स्टेनने रॉस टेलरला धावबाद करून आफ्रिकेला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. नाबाद 86 धावा काढणारा ड्युमिनी सामनावीरचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने सहा गड्यांच्या मोबदल्यात किंवीसमोर विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला आठ गडी गमावून 168 धावांपर्यंत मजल मारता आली. यासह आफ्रिकेने या स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. यापूर्र्वी, सलामी सामन्यात श्रीलंकेने आफ्रिकेला धूळ चारली होती. तसेच न्यूझीलंडचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला.नुकतीच किंवींना इंग्लंडवर मात केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात न्यूझीलंडला विजयाची संधी होती. मात्र, स्टेनने न्यूझीलंडच्या विजयाला हुलकावणी दिली. धावांचा पाठलाग करणार्‍या न्यूझीलंडकडून विलियमसनने (51) व गुप्टिलने (22) अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, मोर्कलने गुप्टिलला बाद केले. त्यापाठोपाठ कर्णधार मॅक्लुम 4 धावा काढून तंबूत परतला. अखेर, टेलरने सलामीवीर विलियमसनला साथ दिली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 51 धावांची खेळी केली. यात विलियमसनने 35 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावा काढल्या. तसेच टेलरने 37 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह सर्वाधिक 62 धावा काढल्या. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.

तत्पूर्वी, आफ्रिकेचा सलामीवीर डिकॉक (4) स्वस्तात बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार डुप्लेसिस (13) व एल्बी डिव्हिलर्स (5) तंबूत परतले.

ड्युमिनीचे नाबाद अर्धशतक
पाचव्या क्रमांकावर आलेल्या ड्युमिनीने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. त्याने 43 चेंडूंचा सामना करताना दहा चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 86 धावा काढल्या. यासह त्याने वर्ल्डकपमध्ये अर्धशतक साजरे केले आणि आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.