आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसीचे घूमजाव; यंदाही एकच विजेता, संयुक्त जेतेपदाचा निर्णय आयसीसीने फिरवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना बरोबरीत सुटला तर ‘सुपर ओव्हर’चा वापर न करता दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्याचा एेतिहासिक निर्णय आयसीसीने २८ जानेवारी रोजी दुबईत झालेल्या आपल्या मीटिंगमध्ये बदलला आहे. यंदाच्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन्ही संघांची बरोबरी झाल्यास विजेता निश्चित करण्यासाठी ‘सुपर ओव्हर’चा वापर करण्यात येईल. गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूंच्या वर्तणुकीला चाप लावण्यासाठी पंचांना अधिक अधिकार देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.