आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार इंडियाला ८ वर्षांसाठी आयसीसीने दिले प्रसारणाचे हक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगातील १७ टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग कंपन्यांमधून रविवारी आयसीसीने आगामी आठ वर्षांच्या दृक-श्राव्य हक्कांच्या वितरणासाठी स्टार इंडिया आणि स्टार मिडल ईस्टची निवड केली. आयसीसीच्या बिझनेस कॉर्पोरेशन बोर्ड आणि कमर्शियल शाखेने दुबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.

आयसीसीने या व्यवहाराची रक्कम जाहीर केली नसली तरीही ही रक्कम याआधीच्या वितरण हक्कांसाठी घेण्यात आलेल्या रकमेपेक्षा खूपच मोठी असल्याचे कळते. आठ वर्षांच्या या वितरण हक्काच्या कालावधीदरम्यान आयसीसीच्या १८ स्पर्धांचा समावेश आहे. त्यामध्ये २०१९ व २०२३ चे विश्वचषक, २ आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धा (२०१७ व २०२१) तसेच आयसीसीच्या ट्वेन्टी-२०च्या दोन (२०१६ व २०२०) विश्वचषक स्पर्धा यांचा समावेश आहे. सध्याचे ईएसपीएन-स्टार स्पोर्टस यांचा करार २०१५ च्या न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियातील विश्वचषक स्पर्धेनंतर संपत आहे. आठ वर्षांच्या या करारामुळे आयसीसीच्या सदस्य राष्ट्रांच्या क्रिकेट बोर्डांना प्रबळ आर्थिक स्थैर्य मिळेल अशी आशा श्रीनिवासन यांनी व्यक्त केली.
* आयसीसीच्या आयर्लंड, स्कॉटलंड, बांगलादेश, झिम्बाब्वे येथे होणा-या पात्रता फेरीच्या स्पर्धा
* महिलांच्या विश्वचषक स्पर्धा व १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धांचा समावेश
* आयसीसीने रविवारी आपल्या स्पर्धांच्या हक्कांचे वितरण करताना स्थानिक यजमानांचे प्रसारण हक्क राखून ठेवले आहेत.