आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ice Bucket Challenge Comes To India, Saina Jwala Yuvraj Take Bath

VIDEO: सानिया मिर्झाने स्विकारले'आइस बकेट चॅलेंज'; बर्फाच्‍या पाण्‍याने केली आंघोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टेनिसपटू सानिया मिर्झा थंडगार पाण्‍याने आंघोळ करताना)
गेल्‍या दोन दिवसांपासून आकर्षणाचे केंद्र राहिलेले 'आइस बकेट चॅलेंज'ने भारतीय क्रिडापटूंनाही आकर्षित केले आहे.यामध्‍ये टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू ज्‍वाला गुट्टा आणि पोनप्‍पा तसेच क्रिकेटपटू युवराजसिंह यांनी सहभाग घेतला. त्‍यांनी चॅलेंज नुसते स्विकारलेच नाही तर बर्फाच्‍या पाण्‍याने आंघोळसुध्‍दा केली आहे. आणि त्‍याचा VIDEO सोशल साइट्सवर पोस्‍ट केला आहे.

VIDEO झाला व्‍हायरल
सानिया मिर्झाने टेनिसकोर्टवरच या चॅलेंजचा स्विकार केल्‍याचा VIDEO अपलोड केला होता. परंतु त्‍यामध्‍ये बर्फ नव्‍हते असा आक्षेप चाहत्‍यांनी घेतल्‍यानंतर सानियाने दुसरा VIDEO अपलोड केला.
येथून सुरु झाली चॅलेंजची सुरवात
अमेरिकेचा बेसबॉल खेळाडू आणि एमियोट्रॉफिक लेट्रल स्‍केलेरॉसिस यांनी न्यूरोडिजेनेरेटिव रोगाने पछाडलेल्‍या पीट फ्रेट्सचा व्हिडिओ सोशल साइटवर अपलोड केला होता. तेव्‍हापासून आइस बकेट चॅलेंजची सुरुवात झाली आहे.
कशी मिळाली कल्‍पना ?
बेसबॉल खेळाडूला ही कल्‍पना त्‍याचा मित्र कोरी ग्रिफन याने दिली. त्‍यानंतर ही कल्‍पना जगभर लोकप्रिय झाली. गेल्‍या 16 ऑगस्‍ट रोजी कोरीचा मृत्‍यू झाला.

काय आहे आइस बकेट चॅलेंज ?
बर्फांच्‍या बादलीभर पाण्‍याने आपण आंघोळ करायची आणि 24 तासांच्‍या आत इतर तीन जणांना आंघोळीसाठी तयार करायचे. जर आंघोळ करणारे तीन जण तयार झाले नाहीत तर आपण 'न्यूरोडिजेनेरेटिव डिसऑर्डर' शी झुंज देणा-या रुग्‍णांच्‍या मदतीसाठी काम करणा-या सेवाभावी संस्थेला 100 अमेरिकी डॉलर दान म्‍हणून द्यायचे.

काय आहे खरी परिस्थिती ?
खरे तर 'न्यूरोडिजेनेरेटिव डिसऑर्डर' हा आजार मस्तिष्‍काशी जोडला गेला आहे. त्‍याबद्दल जागरुकता निर्माण करण्‍यासाठी हा उपक्रम सुरु करण्‍यात आला आहे. या आजारामुळे अमेरिकेत प्रत्‍येक 90 मिनिटाला एकाचा मृत्‍यू होत आहे. हा आजार प्रामुख्‍याने 40 ते 70 या वयोगटातील मणुष्‍यांना उद्भवतो.

मार्क झुकेरबर्गने सुध्‍दा स्विकारले चॅलेंज
आइस बकेट चॅलेंजला आ‍तापर्यंत फेसबुकचा संस्‍थापक मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉप्‍टचा सीईओ सत्‍या नाडेला, बिल गेट्स, हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनी जूनिअर, टेनिसपटू नोवाक जाकोविच, लेडी गागा, गायक जस्टिस बी‍बर, फुटबॉलर ख्रिस्‍टीयानो रोनाल्‍डो आणि लियोनेल मेसी यांनी आतापर्यंत या चॅलेंजचा स्विकारला आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, कोणी-कोणी केले या चॅलेंजचा स्विकार, सोबत पाहा VIDEO