आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीएलचा क्रिकेटपटू करतोय जंगलात नोकरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळण्याची पात्रता असलेला वेगवान गोलंदाज अभिषेक ताम्रकरला आता फॉरेस्ट गार्ड म्हणून काम करावे लागत आहे.
अष्टपैलू कामगिरीच्या बळावर त्याने 2007 मध्ये अहमदाबाद टीमकडून इंडियन क्रिकेट लीगच्या तीन सामन्यांत सहभाग घेतला होता. वर्षाकाठी 12 लाखांच्या पॅकेजवर त्याची निवडही झाली होती. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीएलवर बंदी घातली. यामुळे अभिषेकने आयसीएलसोबतचा करार तोडून टाकला. त्यानंतर बीसीसीआयने आयसीएलवरची बंदी उठवली. मात्र, या वेळी अभिषेकला राष्ट्री य क्रिकेट टीममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. आता त्याला नाईलाजाने 8000 रुपयांच्या पगारावर वन खात्यामध्ये नोकरी करावी लागत आहे.

अभिषेकने आयसीएल सामन्यात अहमदाबाद, हैदराबाद व चंदीगडमध्ये तीन सामने खेळले आहेत. या वेळी तो 20 वर्षांचा होता. तेव्हा तो ताशी 135 ते 138 कि.मी. वेगाने गोलंदाजी करत होता. त्याने भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मात्र, त्याला भारतीय संघच नव्हे तर, बीसीसीआयच्या कोणत्याही स्तरावरच्या स्पर्धेत खेळण्याची अद्याप संधी मिळाली नाही. अखेर आंतरराष्ट्रीय व राष्ट्री य स्तरावर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न भंगल्यामुळे त्याने मागच्या महिन्यात दुर्ग जिल्ह्याच्या वन खात्यात नोकरी मिळवली. दरम्यान, अभिषेक आयसीएलकडून खेळल्याची माहिती वन अधिका-या ंना मिळाली. तेव्हा त्यांनी तत्काळ त्याची वन खात्याच्या क्रिकेट संघात निवड केली.

राजेश चौहानचे मार्गदर्शन
अभिषेक छंद म्हणून क्रिकेट खेळत होता. 2001 मध्ये त्याने माजी क्रिकेटपटू राजेश चौहानसोबत एक सामना खेळला. अभिषेकची गोलंदाजी त्यांनी पाहिली आणि तत्काळ त्याला अकादमीत बोलावून घेतले. त्यानंतर योग्य ते मार्गदर्शन करून चौहान यांनी अभिषेकच्या गोलंदाजीला दिशा दिली.