आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे आहेत क्रिकेटच्या इतिहासातील AMAZING MOMENTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो : सर डॉन ब्रॅडमन यांच्या पुतळ्याजवळ सचिन, नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर रोमांचित विजय मिळवल्यानंतर सौरव गांगुलीने असा टी शर्ट फिरकवला होता. एका सामन्यादरम्यान क्रिकेटचा देव मानलेल्या सचिनच्या पाया पडताना युवराज सिंह, आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरूद्ध 6 षटकार ठोकताना... - Divya Marathi
फाईल फोटो : सर डॉन ब्रॅडमन यांच्या पुतळ्याजवळ सचिन, नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर रोमांचित विजय मिळवल्यानंतर सौरव गांगुलीने असा टी शर्ट फिरकवला होता. एका सामन्यादरम्यान क्रिकेटचा देव मानलेल्या सचिनच्या पाया पडताना युवराज सिंह, आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरूद्ध 6 षटकार ठोकताना...
नवी दिल्ली- वर्ल्ड कप संपल्यानंतर आठवड्याभरात सुरु झालेल्या आयपीएलची जादू क्रिकेटरसिकांना मोहिनी घालू लागली आहे. क्रिकेटचा जुनून भारतात इतका आहे भारताला क्रिकेटची महाशक्ती म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारताने क्रिकेट विश्वात महत्वपूर्ण यश मिळवले आहे त्याचबरोबर या खेळात नाव कमवित जबरदस्त असे खेळाडू दिले आहेत.
क्रिकेटवर चर्चा झाल्यावर सचिनचे नाव निघणार नाही असे होणारच नाही. 18 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरोधात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणा-या सचिनने 16 नोव्हेंबर, 2013 रोजी वेस्टइंडीजविरूद्ध मुंबईतील घरच्या वानखेडे स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना खेळेपर्यंत सचिनने क्रिकेटमध्ये शेकडो विश्वविक्रम उभे केले आहेत. सचिनएवढे क्रिकेट विश्वात योगदान देणे जवळपास अशक्य आहे. आपल्या 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत सचिनने क्रिकेटला फक्त 'जेंटलमेन गेम' बनवले नाही तर एक ऊंचीही मिळवून दिली.
सचिनप्रमाणेच क्रिकेट विश्वात अशी अनेक नावे आहेत व घटना आहेत ज्या आजही यादगार आहेत. मग अनिल कुंबळेंने कसोटीतील एकाच डावात सर्व 10 गडी टिपणे असो की युवराजने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहा चेंडूवर 6 षटकार ठोकणे असो. क्रिकेटमधील असाच एका यादगार क्षण म्हणजे लार्ड्सवर इंग्लंडविरूद्ध नॅटवेस्ट चषक जिंकल्यानंतर सौरव गांगुलीने टी-शर्ट काढून हवेत फिरकावणे असो क्रिकेटरसिकांच्या मनातून या घटना जातच नाहीत.
तर चला पुढे आपण स्लाईड्सद्वारे पाहूया, क्रिकेटमधील काही रोचक आणि यादगार क्षण...
बातम्या आणखी आहेत...