आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: जर पाकिस्‍तानमध्‍ये क्रिकेट बंद झाले, तर असे होतील यांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तान आज आपला 66 वा स्‍वांतत्‍यदिन साजरा करीत आहे. 66 वर्षांपूर्वी आजच्‍याच दिवशी भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात फाळणी झाली होती.

या 66 वर्षांत दोन्‍ही देशांनी मोठी प्रगती केली आहे. मात्र, काही प्रकरणांमध्‍ये पाकिस्‍तान भारतापेक्षा कायम मागे राहिला. पाकिस्‍तान आपल्‍याच भूमीत असुरक्षित आहे. भारतात भलेही क्राईम रेट वाढला असला तरी पाकिस्‍तानच्‍या तुलनेत येथील परिस्थिती चांगली आहे.

किमान पाहुण्‍या संघाच्‍या आणि आपल्‍या खेळाडूंना तरी सुरक्षा देण्‍यात आपण अनेक पटींनी पुढे आहोत. 2009मध्‍ये श्रीलंकन टीमवर झालेला दहशतवादी हल्‍ला सा-या जगाने पाहिला आणि खेळाडूंनी अनुभवला. त्‍यानंतर आजपर्यंत पाकिस्‍तानमध्‍ये एकही आंतरराष्‍ट्रीय सामना झालेला नाही. नुकताच एका फुटबॉल मॅचदरम्‍यान बॉम्‍बस्‍फोट झाल्‍याने खेळाडूंचा जीव गेला होता.

अशात विचार करा, जर पाकिस्‍तानवर क्रिकेट खेळण्‍याची बंदी घालण्‍यात आली तर? क्रीडा प्रेमी तर अशी वेळ येऊ नये असाच विचार करीत असतील. मात्र, आता इंटरनेटवर तंत्रज्ञानाच्‍या साहाय्याने मजेदार फोटो पोस्‍ट करणा-या चाहत्‍यांनी पाकिस्‍तानी खेळाडूंच्‍या क्रिकेटमधील करिअरनंतरच्‍या दिवसांसाठी काही टिप्‍स दिल्‍या. यातील अनेक फोटो पाकिस्‍तानी साईटवर पोस्‍ट करण्‍यात आले आहेत.

वरील फोटोंमध्‍येच पाहा, ज्‍या आफ्रिदीवर चित्रपट बनवण्‍यात आला आहे. त्‍याचीच या छायाचित्रात खिल्‍ली उडवण्‍यात आली आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, पाकिस्‍तानी खेळाडूंची इंटरनेटवर कशी उडवण्‍यात आली होती खिल्‍ली...