आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIC Champion Trophy Cricket Match Today, India Vs South Africa

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आजपासून; भारत- द.आफ्रिका समोरासमोर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटनीय सामना भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवारी खेळवला जाईल. सलग दोन सराव सामने जिंकणार्‍या टीम इंडियाचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. धोनी ब्रिगेड आता तगड्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेकडे वेगवान गोलंदाजांची फौज आहे. यांच्या बळावर आफ्रिका टीमला विजयाचा विश्वास आहे. जबरदस्त फॉर्मात असलेल्या खेळाडूंनी संघाला सराव सामन्यात विजय मिळवून दिला. यासह खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केले आहे.

दालमिया यांची संकल्पना
1998 मध्ये आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमियांनी आंतरराष्टÑीय क्रिकेटला आर्थिक पाठबळ देण्यासाठी नवीन मल्टिनॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिपचा प्रारंभ केला. सुरुवातीला मिनी वर्ल्डकपच्या स्वरूपात सुरू झालेली ही स्पर्धा पुढे चॅम्पियन्स ट्रॉफी नावाने ओळखली जाऊ लागली. टी-20 वर्ल्डकप आणि आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी काळानुसार विविध देशातील चाहत्यांच्या पंसतीस पडली नाही.

शेवटची ट्रॉफी; उत्साह तोच
1998 पासून मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीने 15 वर्षांत अफाट प्रसिद्धी मिळवली. आर्थिक स्वरूपात हा प्रयोग यशस्वी ठरला. पुढील वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाणार नाही. आता कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आयसीसीचा ‘जागता पहारा’
लंडन- आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगसारखा गैरप्रकार रोखण्यासाठी आता आंतराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनचे भ्रष्टाचारविरोधी पथक चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जागता पहारा ठेवणार आहे. हे पथक स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघांच्या खेळाडूंवर नजर ठेवणार आहे. या खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीकडे या पथकाच्या अधिकार्‍यांचे लक्ष असणार आहे. तसेच खेळाडूंना सामना सुरू होण्यापूर्वी आपले मोबाइल प्रशिक्षकांकडे जमा करावे लागणार आहेत. यासाठी आयसीसीच्या पथकाने खेळाडूंना विशेष सुरक्षेसाठी एक तासाचे मार्गदर्शन केले.

यशस्वी फलंदाज: गेलचे तुफान
वेस्ट इंडीजचा क्रिस गेल हा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने एकूण 14 सामन्यांत तीन शतकांसह 695 धावा काढल्या.

यशस्वी गोलंदाज: मुरलीची कमाल
श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 17 सामन्यांत सर्वाधिक 24 विकेट घेतल्या आहेत.टॉप-5 गोलंदाजांमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही.

या आहेत दमदार टीम
ऑस्ट्रेलिया: सलग तिसर्‍यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यास इच्छुक
सक्षम बाजू :युवा गोलंदाजांची फौज
दुबळी बाजू : मधली फळी अपयशी, तळातल्या फलंदाजांना अनुभव नाही.
संघ : एम.क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली, डेव्हिड वॉर्नर, नॅथन काल्टर नाईल, शेन वॉटसन, फिलिप ह्यूज, अ‍ॅडम वोजेस, मॅथ्यू वेड, ग्लेन मॅक्सवेल, एम. मार्श, जेम्स फ्युकनर, डोहर्थी, सी. मॅकी, मिचेल जॉन्सन, एम. स्टार्क.

भारत: ट्रॉफी घेऊन परतणार
मजबूत बाजू : फलंदाजांमध्ये मोठ्या खेळीची क्षमता
दुबळी बाजू : सलामी जोडी अपयशी,सुमार वेगवान गोलंदाजी
संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, शिखर धवन, रवींद्र जडेजा, कार्तिक, कोहली, भुवनेश्वर कुमार, मिश्रा, इरफान पठाण, सुरेश रैना, ईशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, विनयकुमार, उमेश यादव.

न्यूझीलंड: नव्या उत्साहात संघ
मजबूत बाजू : आक्रमक खेळीत फलंदाज माहिर, टॉपऑर्डर चांगल्या फॉर्मात
दुबळी बाजू : वेगवान गोलंदाजी दर्जा सुधारावा लागेल.
संघ : बी. मॅक्लूम (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, बे्रसवेल, अँड्र्यू इलिस, जेम्स फ्रॅकलिंन, मार्टिन गुप्तिल, काइल मिल्स, नॅथन मॅक्लुम, मिल्स, कोलिन मुन्रो, ल्यूक रोंची, टीम साउथी, आर. टेलर, डॅनियल व्हिट्टोरी, के. विल्यमसन.

इंग्लंड: घरच्या मैदानावर करणार कमाल
मजबूत बाजू : वेगवान व फिरकी गोलंदाज फॉर्ममध्ये. फलंदाजही धावा काढण्यात सक्षम
दुबळी बाजू : मधली फळी एकापाठोपाठ ढेपाळते.
संघ : अ‍ॅलेस्टर कुक (कर्णधार), जेम्स अ‍ॅँडरसन, जॉनी बॅरिस्टो, इयान बेल, रवी बोपारा, टीम ब्रेसनन, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, ज्यो रूट, जी. स्वान, जेम्स ट्रेडवेल, जोनाथन ट्रॉट.

श्रीलंका: किताबासाठी कटिबद्ध
मजबूत बाजू : सातव्या क्रमांकापर्यंत सक्षम फलंदाज
दुबळी बाजू : वेगवान गोलदांजी सपशेल अपयशी.
संघ : ए. मॅथ्यूस (कर्णधार), दिनेश चांदिमल, तिलकरत्ने दिलशान, एस. इरंगा, रंगना हेराथ, महेला जयवर्धने, नुवान कुलशेखरा, एल. मलिंगा, कुशल परेरा, टी. परेरा, कुमार संगकारा, एस. सेनानायके, एल. तिरीमाने, सी. वेलगेदरा,जीवन मेडिंस.

द. आफ्रिका: विजेतेपदाची प्रबळ दावेदार टीम
मजबूत बाजू : फलंदाज, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण जबरदस्त.
दुबळी बाजू : मोठी स्पर्धा जिंकता आली नाही.
संघ : डिव्हिलर्स (कर्णधार), अमला, बेहारडीन, ड्युमिनी, डुप्लेसिस, कोलिन इंग्राम, रेयॉन मॅक्लारेन, डेव्हिड मिलर, मोर्ने मोर्केल, अल्विरो पीटरसन, रॉबिन पीटरसन, आरोन फागिसो, डेल स्टेन.

पाकिस्तान: या वेळी विजेतेपदाची आशा
मजबूत बाजू : म् मोठ्या खेळीसाठी आघाडीचे फलदांज सक्षम आहेत.
दुबळी बाजू : सुमार क्षेत्ररक्षण, मधल्या फळीतले फलंदाज अपयशी
संघ : मिसबाह (कर्णधार),अब्दुर रेहमान, असद अली, असद शफिक, इम्रान , जुनैद , कामरान अकमल, मोहंमद हाफिज, मोहंमद इमरान, नासेर जमशेद, सईज अजमल, शोएब मलिक, अमीन, वहाब रियाझ.

वेस्ट इंडीज: ऑलराउंडरचा असणार दबदबा
मजबूत बाजू : गेल, डेवेन ब्राव्होसारखे मातब्बर व यशस्वी फलंदाज
दुबळी बाजू : दडपणात टीम अपयशी.
संघ : डेवेन ब्राव्हो (कर्णधार), रामदीन, बेस्ट, डी. ब्राव्हो, चार्ल्स, गेल, सुनील नारायण, पोलार्ड, रवी रामपाल, केमार रोंच, डॅरेन सॅमी, सॅम्युअल्स, आर. सरवान.