आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Important Meeting For India\'s Entery In Olympic

भारताच्या ऑलिम्पिक पुनर्प्रवेशासाठी महत्त्वाची बैठक होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरिंदर बत्रा आणि झारखंड ऑलिम्पिक असोसिएशनचे आर. के. आनंद यांचा आयओसीने येत्या 15 मे रोजी लुझान येथे होणा-या बैठकीसाठीच्या भारतीय शिष्टमंडळात समावेश करण्यास परवानगी दिल्यानंतर त्या बैठकीतून आयओएचे माजी हंगामी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा आणि माजी सरचिटणीस रणधीरसिंग यांनी माघार घेतली आहे.


भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनवरील (आयओए) निलंबनाची कारवाई मागे घेण्यासंदर्भात भारतीय शिष्ठमंडळाशी चर्चा करण्याकरिता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लुझान येथे बैठक आयोजित केली. लुझान येथील बैठकीत तरलोचनसिंग, रघुनाथन व रामचंद्रन यांचा समावेश केला होता. मल्होत्रा यांनी माघार घेतली असली तरीही हे तीन सदस्य मात्र त्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.


रणधीरसिंग यांनीही आयओसीला बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे लेखी कळवले आहे. याचे कारण वैयक्तिक असून, आपण त्याबाबत आयओसीच्या अध्यक्षांशी चर्चा करणार त्यांनी सांगितले.


येत्या 15 मे रोजी संयुक्त बैठक
15 मे रोजी लुझान येथील बैठकीत भारतीय क्रीडामंत्रालयाचे प्रतिनिधी, आयओएचे प्रतिनिधी यांच्यात संयुक्त बैठक होणार आहे. त्यामध्ये नरिंदर बत्रा आणि आनंद यांचा समावेश असेल, असे आयओसीने कालच (8 मे) जाहीर केल्यामुळे आज मल्होत्रा व रणधीरसिंग यांनी त्या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.