आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Ipl Auction All Rounder ,fast Bowaller For Ahead

आयपीएल-6: लिलावात अष्टपैलू क्रिकेटपटूंची चलती, मॅक्सवेल ठरला सगळ्यात महागडा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल-6च्या बोली प्रक्रियेदरम्यान राजस्‍थान रॉयल्सची मालकीण शिल्पा शेट्टी,राजीव शुक्ला - Divya Marathi
आयपीएल-6च्या बोली प्रक्रियेदरम्यान राजस्‍थान रॉयल्सची मालकीण शिल्पा शेट्टी,राजीव शुक्ला

चेन्नई - आयपीएल-6 साठी रविवारी झालेल्या बोली प्रक्रियेत अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाजांना चांगलीच मागणी होती. अव्वल दहा महागड्या खेळाडूंत अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाजांशिवाय फक्त एका फिरकीपटूला स्थान मिळाले. यष्टिरक्षक फलंदाजाला संधी देण्यास एकानेही रस दाखवला नाही.

ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल पाच कोटींपेक्षा अधिकच्या रकमेत विकला जाणारा एकमेव खेळाडू ठरला. टॉप-10 मध्ये त्याच्याशिवाय अष्टपैलू अभिषेक नायर, अष्टपैलू तिसारा परेरा, सुचित्रा सेनानायके, क्रिस मोरिस यांनी तीन कोटींचा आकडा ओलांडला. वेगवान गोलंदाजांत केन रिचर्डसन, डर्क नानेस, जयदेव उदनकट, मनप्रीत गोली महागडे टॉप टेनमधील खेळाडू ठरले. श्रीलंकेचा मिस्ट्री गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणारा अजंता मेंडिसला आधार मूल्यापेक्षा 14 पट अधिक रक्कम मिळाली. 26.50 लाख रुपये आधार मूल्य असलेल्या या खेळाडूला पुण्याने 3.85 कोटीत खरेदी केले.

खूप उत्साही आहे !
‘आयपीएलच्या बोलीसाठी मी चेन्नईत आहे. खूप एक्सायटेड आहे. वेडेपणा सुरू...तर चला थोडी शॉपिंग करूया.’
शिल्पा शेट्टी, राजस्थान रॉयल्सची सहमालकीण. (बोली सुरू होण्यापूर्वी शिल्पाचा ट्विट)

आधार मूल्यावरच क्लार्क-पाँटिंगची विक्री
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग आधार मूल्यातच विकले गेले. दोघांनी स्वत:ची किंमत चार लाख डॉलर इतकी लावली होती. याच किमतीवर पाँटिंगला मुंबईने तर क्लार्कला पुण्याने खरेदी केले. या दोघांशिवाय आणखी दहा खेळाडू आधार मूल्यांवर विकले गेले.

फिलेंडरला खरेदीदार नाही
द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेर्नोन फिलेंडरला बोलीत खरेदीदार मिळाला नाही. ही सर्वांनाच चकित करणारी घटना घडली. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तिल, श्रीलंकेचा उपुल थरंगा यांच्यावरही कोणी बोली लावली नाही.

कोण आहे हा ग्लेन मॅक्सवेल ?
नाव : ग्लेन जेम्स मॅक्सवेल
जन्म : 4 ऑ क्टोबर, 1988 (मेलबर्न)
संघ : ऑ स्ट्रेलिया फलंदाजी : उजव्या हाताने
गोलंदाजी : राइट आर्म ऑ फ ब्रेक

24 वर्षीय मॅक्सवेलने आतापर्यंत 9 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत.

टी-20 फर्स्ट क्लास कामगिरी
सामने धावा 100 50 बळी
40 571 00 03 15


19 चेंडूत अर्धशतक
व्हिक्टोरियन बुशरेंजर्सचा ग्लेन मॅक्सवेलने 2009-10 मध्ये टास्मानिया या डोमेस्टिक संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 19 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. या उल्लेखनीय कामगिरीनंतर ऑ स्ट्रेलियाचा हा अष्टपैलू खेळाडू प्रकाशझोतात आला. त्याने मार्च 2011 मध्ये शेल्फीड शिल्ड सामन्यात दक्षिण ऑ स्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 103 धावा काढल्या होत्या.

आयपीएल-6 साठी बोली प्रक्रियेतील प्रमुख खेळाडू
खेळाडू देश आयपीएल टीम किंमत
ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया मुंबई इंडियन्स 5.31 कोटी
अभिषेक नायर भारत पुणे वॉरियर्स 3.60 कोटी
अजंता मेंडिस श्रीलंका पुणे वॉरियर्स 3.85 कोटी
डॅरेन सॅमी वेस्ट इंडीज सनराइज हैदराबाद 2.26 कोटी
डर्क नॅनेस ऑस्ट्रेलिया चेन्नई सुपरकिंग्ज 3.19 कोटी
फिडेल एडवर्ड्स वेस्ट इंडीज राजस्थान रॉयल्स 1.11 कोटी
जेकब ओरम न्यूझीलंड मुंबई इंडियन्स 27 लाख
जयदेव उदनकट भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2.79 कोटी
जेसी रायडर न्यूझीलंड दिल्ली डेअरडेव्हिल्स 1.38 कोटी
जेहान बोथा द. आफ्रिका दिल्ली डेअरडेव्हिल्स 2.39 कोटी
ल्यूक पोमर्सबच ऑस्ट्रेलिया किंग्ज पंजाब 1.59 कोटी
मनप्रीत गोनी भारत किंग्ज पंजाब 2.66 कोटी
मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलिया पुणे वॉरियर्स 2.12 कोटी
पंकजसिंग भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 80 लाख
फिलिप ह्युजेस ऑस्ट्रेलिया मुंबई इंडियन्स 53 लाख
रवी रामपॉल वेस्ट इंडीज रॉयल चॅलेंजर्स 1.54 कोटी
रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलिया मुंबई इंडियन्स 2.12 कोटी
रुद्रप्रतापसिंग भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2.12 कोटी
सुदीप त्यागी भारत सनराइज हैदराबाद 53 लाख
तिसरा परेरा श्रीलंका सनराइज हैदराबाद 3.60 कोटी