स्पोर्ट्स डेस्क- इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या बॉलिवूड अॅक्ट्रेस परिणिती चोप्रामुळे चर्चेत आहे. एका चॅट शो दरम्यान परिणीतीने सांगितले की, टेनिस स्टार सानिया मिर्झाला वाटते जेव्हा तिच्यावर बायोपिक बनेल तेव्हा लीड रोल मलाच मिळावा. याचे कारण सानिया आणि माझा चेस्ट पोर्शन एकसारखाच आहे. मात्र, ही काही पहिली वेळ नाही की सानिया मिर्झा वादात फसली आहे. याआधीही ती अनेकदा वादात अडकली होती. ड्रेसमुळे संकटात सापडली होती सानिया...
- सानियाने एका इंटरव्यू दरम्यान वर्ष 2005 मध्ये झालेल्या एका वादाची कटू आठवण सांगितले होती.
- ही घटना सप्टेंबर 2005 ची आहे जेव्हा एका मुस्लिम धर्मगुरूने सानिया मिर्झाला टेनिस ड्रेसवरून तिच्याविरूद्ध फतवा जारी केला होता.
- त्या धर्म गुरूने म्हटले होते की, इस्लाममध्ये महिलांना पब्लिकली स्कर्ट्स, शॉर्ट्स आणि स्लीवलेस टॉप्स घालण्यास बंदी आहे. तसेच फतवा जारी केलेल्या व्यक्तीने तसे कपडे परत घातले तर त्याला शारीरिक नुकसान थोडक्याच जीवे मारण्याची करण्याची धमकी दिली होती.
- या घटनेने खळबळ माजली व देशात काही मिनिटांत मोठी बातमी बनली. हे ऐकून, वाचून सानियाला मोठा धक्का बसला व हैराण झाली.
एयरपोर्टवर आला धक्कादायक अनुभव-
- सानियाच्या ड्रेसवरून तिच्याविरूद्ध हा फतवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जारी करण्यात आला होता. यानंतर 15 दिवसानी सनफीस्ट ओपन WTA टूर्नामेंट सुरु होणार होती.
- टूर्नामेंट खेळण्यासाठी सानिया आपल्या आईसमवेत 15 सप्टेंबर 2005 रोजी कोलकात्यातील दम-दम एयरपोर्टवर पोहचली. या दोघी जशा एयरपोर्टमधून बाहेर येताच सुरक्षारक्षकांनी त्यांना घेरले. खरं तर ड्रेस कंट्रोवर्सीनंतर सानियाला मिळालेल्या धमकीमुळे तिच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
- सानिया जेथे कुठे जायची तेथे सिक्युरिटी तिच्यासोबत असायचे. हॉटेलच्या आसपास सुद्धा सानियाची सिक्युरिटीसाठी अनेक सुरक्षाकर्मी तैनात होते. हे सर्व सानियासाठी नवे होते.
- या प्रकारामुळे सानिया खूपच घाबरली. तिला अचानक भीती वाटू लागली. यानंतर तिने आपल्या पापाला फोन करून परिस्थिती सांगितली. तिचे वडिल नुकतेच अमेरिकेवरून परतले होते आणि आराम करत होते.
- सानियाच्या माहितीनुसार, 'माझा फोन जाताच माझी छोटी बहिण अनमसोबत फ्लाईट पकडून काही तासातच कोलकात्यात पोहचले. त्यानंतर मला सुरक्षित वाटू लागले. यानंतर आम्ही कुटुंबिय हॉटेलमधील रूममध्ये एकत्र होतो.'
- ही घटना सानियासाठी दुखद होती. सानियाने सांगितले की, 'या घटनेनंतर मला तेथे खेळण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्या स्पर्धेत मी दुस-या राऊंडपर्यंत पोहचली. दुस-या राउंडमध्ये मी पहिला सेट जिंकला मात्र मॅच हारली.'
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेलेब्ससोबतचे सानियाचे फोटोज आणि तिच्या लाईफसंबंधित काही फॅक्ट्स...