अॅडिलेड - कर्णधार
विराट कोहली आणि मुरली विजयने
टीम इंडियाला विजयाच्या दिशेने नेले होते. मात्र, 70 व्या ओव्हरमध्ये नॅथन लॉयनने मुरलीला (99) पायचीत केले आणि सामन्याचा नूरचा पालटला. मुरली बाद झाल्यानंतर भारतीय संघाची सुरु झालेली पडझड शेवटपर्यंत थांबली नाही. विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र टीम इंडियाचा स्कोअर 304 असताना नॅथन लॉयनने विराट कोहलीचा त्रिफळा उडवून भारताच्या विजयाच्या अशा संपवल्या.
त्यानंतरचे फलंदाज केवळ हजेरी लावून परतले. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 315 धावांत गुंडाळले आणि यजमानांचा 48 धावांनी विजय झाला.
ऑफ स्पिनर नॅथन लॉयन आज ऑस्ट्रेलियाचा हिरो आणि भारतासाठी व्हिलन ठरला. त्याने 157 धावा देत कर्णधार कोहलीसह भारताच्या 7 खेळाडूंना बाद केले. पहिल्या डावातही त्याने 5 विकेट घेतल्या होत्या.
लॉयनने दिला झटका
विराट कोहलीच्या शतकानंतर टीम इंडियाला दोन धक्के बसले. प्रथम सलामीवीर मुरली विजयला नॅथन लॉयनने बाद केले. त्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अजिंक्य राहाणे भोपळाही न फोडता परतला.
विराट कोहलीचे विक्रमी शतक
विराट कोहलीने ऐतिहासिक शतक लगावले. कसोटी कर्णधार म्हणून त्याचा हा पहिलाच सामना होता. या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये त्याने शतक झळकवले. हा कारनामा करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपलने एकाच सामन्यातील दोन डावात शतक झळकावले होते. विशेष म्हणजे, हा कारनामा करणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याच्यासोबत मैदानात असलेला मुरली विजयचे मात्र एका धावेने शतक हुकले. मुरली 99 धावांवर बाद झाला.
चौथा दिवस
डेव्हिड वॉर्नरच्या सलग दुसर्या शतकाने पाहुणा भारतीय संघ पहिल्या कसोटीत बॅकफूटवर आला. त्याने शुक्रवारी चौथ्या दिवशी शानदार 102 धावांची खेळी केली. या शतकाच्या बळावर यजमान ऑस्ट्रेलिया संघाने दुसर्या डावात पाच बाद 290 धावा काढल्या. याशिवाय यजमानांनी पहिल्या डावातील 73 धावांच्या आघाडीसह आता भारतावर एकूण 363 धावांची आघाडी मिळवली. आज शनिवारी पाचव्या दिवशी टीम इंडियाला पराभवाचे सावट दूर सारण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सामना वाचवण्याचे मोठे आव्हान भारतासमोर आहे.
कसोटीचा चौथा दिवस नॅथन लॉयन आणि वॉर्नर यांनी गाजवला. ऑफस्पिनर लियोनने पाच गडी बाद करून भारताचा पहिला डाव 444 धावांत गुंडाळला. यात त्याची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यानंतर सलामीवीर वॉर्नरने स्फोटक फलंदाजी केली. त्याने दुसर्या डावातही शतक झळकावले. यात त्याने 102 धावांची खेळी केली. यापूर्वी वॉर्नरने पहिल्या डावात 145 धावा काढल्या होत्या. ‘पॉकेट डायनामाइट’ वॉर्नरच्या शतकाने ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेर पाच गडी गमावून 290 धावा काढल्या.
भारताने पाच बाद 369 धावांवरून चौथ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. या वेळी ऱोहित शर्मा आणि वृद्धिमान साहाने संघाची धावसंख्या 399 वर आणून ठेवली. यादरम्यान रोहित शर्मा बाद झाला. त्यापाठोपाठ भारतीय संघाची पडझड सुरू झाली. यासह पूर्ण संघ 444 धावांपर्यत मजल मारू शकला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला मोठी आघाडी घेता आली.
अॅडिलेड कसोटी स्कोअरकार्ड
ऑस्ट्रेलिया पहिला डाव |
517/7 (घोषित) |
फलंदाजी |
डेव्हिड वॉर्नर - 145 धावा कर्णधार माइकेल क्लार्क - 128 धावा स्टिव्हन स्मिथ- 162* धावा |
गोलंदाजी |
मोहम्मद शमी - 2/120 वरुण आरोन - 2/136 कर्ण शर्मा - 2/143 इशांत शर्मा - 1/85 |
भारत पहिला डाव |
444/10 (73 धावा पिछाडी) |
फलंदाजी |
विराट कोहली - 115 धावा चेतेश्वर पुजारा - 73 धावा अजिंक्य रहाणे - 62 धावा मुरली विजय - 53 धावा शिखर धवन - 25 धावा रोहित शर्मा - 43 धावा |
गोलंदाजी |
मिशेल जॉन्सन - 2/102 नॅथन लॉयन- 5/138 रेयान हॅरिस - 1/55 पीटर सिडल - 2/88 |
ऑस्ट्रेलिया (दूसरा डाव) |
290/5 (घोषित) |
फलंदाजी |
डेव्हिड वॉर्नर- 102 धावा स्टिव्हन स्मिथ 52* मिचेल मार्श - 40 धावा |
गोलंदाजी |
कर्ण शर्मा - 2/95 मोहम्मद शमी - 1/42 वरुण आरोन - 1/43 रोहित शर्मा - 1/35 |
भारत दूसरा डाव |
( 364 धावांचे आव्हान) 315/10 |
फलंदाजी |
कर्णधार विराट कोहली - 141 धावा मुरली विजय - 99 धावा चेतेश्वर पुजारा - 21 धावा |
गोलंदाजी |
नॅथन लॉयन- 7/152 मिशेल जॉन्सन - 2/45 रेयान हॅरिस - 1/49 |
निकाल - ऑस्ट्रेलिया 48 धावांनी विजयी. |