आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ind Vs Bangladesh Asia Cup ODI ANALYSIS In Marathi

ANALYSIS: बांगलादेशावर विजय! पाकिस्तान-श्रीलंकेसोबतही असे घडेल याची शक्यता कमीच?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फातुल्लाह - युवा कर्णधार विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशाविरुद्ध 6 गड्यांनी विजयश्री मिळविली आहे. विराट कोहली 136 धावांसह बांगलादेशचा कर्णधार मुशाफिकूर रहीमच्या 117 धावांच्या खेळीवर वरचढ ठरला आहे. आयसीसी रँकिंगमध्ये क्रमांक दोनवर असलेल्या टीमने बांगलादेशासारख्या छोट्या टीमवर विजय मिळविणे स्वाभाविक होते. यजमानांच्या खेळाने प्रक्षकांचे मन जिंकले आहे.
साऊथ आफ्रीका आणि न्यूझीलंड यांच्याकडून सलग पराभूत झालेल्या टीम इंडियाने येथे सहज विजय मिळविला आहे. फातुल्लाहचे मैदानही भारतासाठी परकीय भूमीवरीलच होते. तरीही येथे टीमने कोणतीही चूक न करता हातात आलेल्या सामन्यावर पकड ठेवत झटपट विजय मिळविला.
त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो, कोहली अँड कंपनीचा खेळ खरोखर टॉप रँकिंग टीमला साजेसा होता का? टीम इंडियाच्या फॅन्सला हा प्रश्न विचारला तर त्यांचे मनोमन उत्तर हे नाही असेच आहे. कारण, भारतीय गोलंदाजांची बांगलादेशच्या फलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. खेळाडूंनी अनेक महत्त्वाचे झेल सोडले आणि फलंदाजीत फक्त कर्णधार कोहलीच लक्षात राहाणारी खेळी करु शकला. आजिंक्य राहाणेने 73 धावांची खेळी करुन वाहव्वा मिळविली असली तरी, कोहली बाद झाल्यानंतर मॅच फिनीशरची भूमिका त्याला पार पाडता आली नाही. जिथे भारतीय संघाला 7 ते 8 गडी राखून विजय मिळविता आला असता तिथे 6 विकेट आणि एक ओव्हर शिल्लक ठेवून विजयाचा आनंद साजरा करावा लागला.