आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडची दमदार सुरुवात; तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी 2 बाद 247, बॅलेन्सचे शतक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊदम्पटन - साऊदम्पटन येथे भारत-इंग्लंड यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या इन्व्हेस्टेक कसोटी मालिकेतील तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. गॅरी बॅलेन्सचे (104) सलग दुसर्‍या कसोटीतील शतक आणि अ‍ॅलेस्टर कुकच्या 95 धावांच्या बळावर इंग्लंडने पहिल्या दिवशी 2 बाद 247 धावा काढल्या आहेत.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय यशस्वी ठरवत अ‍ॅलेस्टर कुक आणि सॅम रॉब्सन या सलामी जोडीने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. ही जोडी जोमात असतानाच भारताचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमीने एकविसाव्या षटकात रॉब्सनला जडेजाकरवी झेलबाद केले. दरम्यान, रवींद्र जडेजाने अ‍ॅलेस्टर कुकला स्लीपमध्ये दिलेले जीवदान भारताला बरेच महाग पडले. कुकने 231 चेंडूंचा सामना करत 9 चौकारांच्या मदतीने 95 धावा काढल्या. गॅरी बॅलेन्सने तब्बल 204 चेंडूंत नाबाद 104 धावा काढल्या. यात 15 चौकारांचा समावेश आहे. सध्या तो इयान बेलसोबत नाबाद खेळत आहे.
निष्प्रभ गोलंदाजी
शॉर्ट पिच चेंडूंच्या मार्‍यासाठी ओळखल्या जाणार्‍या साऊदम्पटनच्या खेळपट्टीवर भारताचा वेगवान मारा निष्प्रभ ठरला. यापूर्वीच्या कसोटीत दमदार प्रदर्शन करणारा भुवनेश्वर कुमार याच्यासह नवोदित पंकज सिंग, फिरकीपटू रवींद्र जडेजाही भारताच्या मदतीला येऊ शकला नाही.
धावफलक
इंग्लंड : पहिला डाव : 2 बाद 247 धावा. अ‍ॅलेस्टर कुक 95, रॉब्सन 26, बॅलेन्स 104, बेल 16 धावा. रवींद्र जडेजा 1/34, मो.शमी 1/62.