बर्मिंगहॅम - वेगवान गोलंदाज मो. शमी (२८ धावांत ३ विकेट) आणि भुवनेश्वर (१४ धावांत २ विकेट) यांच्या शानदार गोलंदाजीनंतर सलामीवीर अजिंक्य रहाणे (१०६) आणि शिखर धवन (नाबाद ९७) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने चौथ्या वनडेत इंग्लंडला ९ गड्यांनी हरवले. यासह भारताने मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. भारताने इंग्लंडमध्ये २४ वर्षांनंतर द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
भारताने इंग्लंडला ४९.३ षटकांत २०६ धावांत गुंडाळले. नंतर ३०.३ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात २१२ धावा काढून वजिय मिळवला. भारताकडून रहाणे-धवन यांनी २८.४ षटकांत १८३ धावांची मजबूत सलामी देऊन वजिय नशि्चित केला. तत्पूर्वी, भारतीय कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा िनर्णय घेतला. त्याचा हा िनर्णय
आपल्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. भारताकडून भुवनेश्वर, मो. शमी, जडेजा, सुरेश रैना, अशि्वन या सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
अजिंक्य रहाणेचे शतक
धावांचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवनने १०० चेंडूंत १०६ धावा काढल्या. या खेळीत त्याने १० चाैकार आणि ४ षटकार मारले. दुसरीकडे सलगच्या अपयशामुळे टीकेचा केंद्रबिंदू ठरलेला शिखर धवन या लढतीत फॉर्मात परतला. धवनने ८१ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ९७ धावा काढल्या. कोहली एका धावेवर नाबाद राहिला.
धावफलक
इंग्लंड धावा चेंडू ४ ६
कुक झे. रैना गो. भुवनेश्वर ०९ १९ २ ०
हेल्स ित्र. गो. भुवनेश्वर ०६ ०७ १ ०
बॅलेंस झे. रहाणे गो. शमी ०७ १९ १ ०
रुट झे. धवल गो. रैना ४४ ८१ २ ०
मोर्गन झे. रैना गो. जडेजा ३२ ५८ ३ ०
बटलर पायचीत गो. शमी ११ २४ ० ०
मोईन अली त्रि.गो. अश्विन ६७ ५० ४ ३
वोक्स धावबाद १० १८ ० ०
फिन त्रि. गो. जडेजा ०२ ०८ ० ०
अँडरसन नाबाद ०१ ०४ ० ०
गुर्नी त्रि. गो. शमी ०३ ०९ ० ०
अवांतर : १४. एकूण : ४९.३ षटकांत सर्वबाद २०६ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-३-१४-२, धवल कुलकर्णी ७-०-३५-०, मो. शमी ७.३-१-२८-३, आर. अशि्वन १०-०-४८-१, रवींद्र जडेजा १०-०-४०-२, सुरेश रैना ७-०-३६-१.
भारत धावा चेंडू ४ ६
रहाणे झे. कुक गो. गुर्नी १०६ १०० १० ४
शिखर धवन नाबाद ९७ ८१ ११ ४
विराट कोहली नाबाद ०१ ०३ ० ०
अवांतर : ८. एकूण : ३०.३ षटकांत १ बाद २१२ धावा. गोलंदाजी : अँडरसन ६-१-३८-०, गर्नी ६.३-०-५१-१, फिन ७-०-३८-०, वोक्स ४-०-४०-०, मोईन अली ७-०-४०-०.