आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ind Vs Eng Under 19 World Cup News In Marathi, Dubai

\'अंडर-19 विश्वचषक\' जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले; इंग्लंडची उपांत्य सामन्यात धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- अंडर-19 विश्वचषक जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले आहे. उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला. या पराभवासोबत भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतून 'आऊट' झाला आहे.

नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून इंग्लंड संघासमोर विजयासाठी 222 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र, इंग्लंडने तीन गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले.

इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली. इंग्लंडला पहिला झटका फिंचच्या रुपात बसला. फिंच 10 धावांवर खेळत असताना मोनू कुमारच्या चेंडूवर तो पायचित बाद झाला. इंग्लंडची एकूण धावसंख्या 6 असताना क्रिजवर उतरलेल्या रेयान हिगिन्स याला चामा मिलिंद याने तंबूत पाठवले. मिलिंदच्या चेंडूवर संजू सॅमसन याने रेयान याला अलगद टिपले.

त्यानंतर सलामीवीर टेटरसाल याला दीपक हुड्डा याने बाद केले. टेटरसाल याने तीन चौकारच्या मदतीने 23 धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी डकेट आणि बार्नार्ड यांनी उभी केलेली 76 धावांची भाग‍िदारी गनी याने तोडली. या जोडीने भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. मात्र गनीच्या चेंडूवर बार्नार्डचा सॅमसनने झेल घेतला. बार्नार्ड याने 24 धावा केल्या. 61 धावांची शानदार कामगिरी करणार्‍या डकेट याला कुलदीप यादवने पॉवेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर मैदानात आलेल्या रोड्स याला अवघ्या 10 धावांवर बोल्ड करून कुलदीप याने विजयाच्या आशा पल्लवित केल्या. इंग्लंडला सातवा झटका क्लार्कच्या रुपात (42) बसला. तेव्हा इंग्लंडच्या एकूण 199 धावा झाल्या होता.

भारतीय संघाने 222 धावांचे आव्हान...
नाणे फेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारतने अवघ्या 24 धावांवर चार गडी गमावले होते. अखेर भारतीय संघाने निर्धारि षटकात आठ गडी गमावून 221 धावा केल्या. कर्णधार विजय झोलने 48, दीपक हुड्डाने 68 तर सरफराज खान याने 52 धावा केल्या.