आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रँकिंगमध्‍ये अव्‍वल राहण्‍यासाठी भारताची धडपड, हे खेळाडू ठरु शकतात कर्दनकाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - डावीकडून डंकन फ्लेचर, महेंद्रसिंह धोनी आणि रवी शास्‍त्री)
 
बर्मिंघम : भारतीयसंघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. इंग्लंडविरुद्ध दोन शानदार विजय तसेच ऑस्ट्रेलियाचा दुबळ्या झिम्बाब्वेकडून झालेल्या अनपेक्षित पराभवाचे हे फलित आहे.
 
आयसीसी रँकिंग कायम राखण्‍यासाठी भारताला चौथा एकदिवसीय सामना कोणत्‍याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.  आज इंग्‍लंड आणि भारत यांच्‍यादरम्‍यान लढत होणार आहे.
 
भारताने यापूर्वी कार्डिफ व नॉटिंगहम येथील सामन्यात विजय संपादन केले. कार्डिफ येथे दुसऱया वनडे सामन्यात धोनी ब्रिगेड डकवर्थ लुईस नियमानुसार 133 धावांनी विजयी ठरले तर नॉटिंगहममध्येही विजयी धमाका कायम राखताना त्यांनी 6 गडी राखून दमदार विजय संपादन केला. तत्पूर्वी, ब्रिस्टॉल येथे उभय संघातील पहिल्या वनडे सामन्यात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता.

धवनची डोकेदुखी कायम
भारतीयसंघ इंग्लंड दौऱ्यावर सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाजीमुळे चिंतेत आहे. सलगपणे संधी मिळूनही धवन अपयशी ठरल्याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच रोहित शर्माचे जखमी होणे भारताला अहितकारक ठरु शकते.
 
एजबेस्‍टनमध्‍ये भारताचा रेकॉर्ड
एजबेस्‍टनमध्‍ये भारताचा विक्रम नेहमीच चांगला राहिला आहे. येथे खेळलेल्‍या सात एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये चार सामने भारताने जिंकले आहेत. आणि तीन सामन्‍यात पराभव झाला आहे. गेल्‍या वर्षी 23 जून रोजी यजमान इंग्‍लंड विरुध्‍द भारताने पाच धावांनी विजय मिळविला आहे.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणते खेळाडू ठरु शकतात भारतासमोर डोकेदुखी