आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ind Vs Nz 4th ODI Hamilton News Hindi, Dhoni Virat Kohli Reason For India S Series Defeat

कर्णधार आणि कोहलीने बुडवली भारताची नौका, वनडेची रँकिंगही गमावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेडॉनपार्क येथे खेळल्‍या गेलेला भारत विरुध्‍द न्‍यूझीलंड हा चवथा एकदिवसीय सामना यजमान संघाने 7 विकेट्सने जिंकला. या विजयासोबतच न्‍यूझीलंडने ही मालिका पाच पैकी 3-0 ने खिशात घातली आहे. या पराभवासोबतच भारताने सलग दुसरी मालिका गमावली आहे.

या पराभवामुळे भारताने आसीसी रॅकिंगमधील पहिले स्‍थान घालवले आहे. एक वर्ष दोन महिन्‍यानंतर भारताची पहिल्‍या पायरीवरून पायउतार व्‍हावे लागले आहे. इंग्‍लडने ऑस्‍ट्रेलियाला नमवल्‍यानंतर भारताला पहिले स्‍थान प्राप्‍त झाले होते. 'नशिबाने दिले आणि कर्माने नेले' अशी गत स्‍तत: केली आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्‍ये भारताने 0-2 अशी मालिका गमावली होती. न्‍यूझीलंड संघाला भारत सहज नमवेल असे वाटत असतांना मात्र उलट झाले. न्‍यूझीलंड संघाने चॅम्पियन्‍स सारखा खेळ केला. आणि भारताला प्रत्‍येक सामन्‍यात नामोहरम केले.

न्‍यूझीलंडसोबत एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये कर्णधार धोनीने संघात दोन महत्‍वाचे बदल केले. शिखर धवनला सामन्‍याबाहेर ठेवत अंबाती रायडूला संघात स्‍थान दिले. विराट कोहलीला सलामीला पाठवून वेगळी रणनिती आखल्‍याचे दाखविले. सलग अयशस्‍वी ठरलेल्‍या सुरेश रैनालाही संघाबाहेर ठेवत अष्‍ठपैलू खेळाडू स्‍टूअर्ट बिन्‍नीला संधी दिली. धोनीचे असे प्रयोग आतापर्यंत यशस्‍वी राहिले आहेत. मात्र न्‍यूझीलंडमध्‍ये धोनीचे सर्वच प्रयोग फसले.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि वाचा, जागतिक क्रमवारित प्रथम क्रमांक गमावण्‍याची काही कारणे...