आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगजेतेपद पटकावण्‍याची 30 वर्षे: जाणून घ्‍या काय करीत आहेत विश्‍वचषक जिंकून देणारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेंद्रसिंह धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली टीम इंडियाने इंग्‍लंडमध्‍ये चॅम्पियन्‍स ट्रॉफी पटकावून इतिहास रचला आहे. शिखर धवन आणि रवींद्र जडेजासारख्‍या युवा क्रिकेटपटूंच्‍या जोरावर टीम इंडियाने यजमान संघाला 5 धावांनी पराभूत केले.

विजय असावा तर असा... 30 वर्षांपूर्वी जून महिन्‍यातच कपिलदेव आणि कंपनीने त्‍या काळातील अव्‍वल संघ वेस्‍ट इंडीजला धूळ चारून विश्‍वचषकावर आपले नाव कोरले होते.

पंजाब दा पुत्तर कपिलादेवने आपल्‍या खेळाडूंमध्‍ये असा जोष निर्माण केला होता की कॅ‍रेबियन खेळाडूंचे त्‍यांच्‍यासमोर काहीच चालू शकले नाही. क्रिकटची मक्‍का समजल्‍या जाणा-या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर 25 जून 1983 रोजी झालेल्‍या सामन्‍यात टीम इ‍ंडियाने विंडीजचा 43 धावांनी पराभव केला होता. कठीण परिस्थितीत 26 धावांची खेळी आणि मोक्‍याच्‍या क्षणी 3 विकेट घेणा-या मोहिंदर अमरनाथला सामनावीराचा पुरस्‍कार देण्‍यात आला होता.

30 वर्षांपूर्वी मिळवलेल्‍या या विजयाचे खास 30 फोटो... आणि जाणून घ्‍या टीम इंडियाला ही अनोखी भेट देणारे हे 11 खेळाडू काय करतात सध्‍या...