आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताने विंडीजला 252 धावांवर रोखले, वीरसॅमीचे अर्धशतक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिजटाऊन - वेगवान गोलंदाज शमीम अहेमद आणि फिरकीपटू राहुल शर्मा यांनी घेतलेल्या प्रत्येकी 3 विकेटच्या बळावर भारतीय अ संघाने वेस्ट इंडीज अ संघाला पहिल्या डावात अवघ्या 252 धावांवर रोखले. चारदिवसीय कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले. भारताने विंडीजला 87.3 षटकांत गुंडाळले.
वेस्ट इंडीजकडून यष्टीरक्षक फलंदाज डी. थॉमस (57) आणि तळाचा फलंदाज वीरसॅमी परमॉल (66) यांनी अर्धशतके ठोकून संघाचा डाव सावरला. अन्यथा विंडीजचा डाव दोनशेच्या आतच गारद झाला असता. भारताकडून राहुल शर्मा (3/73) आणि शकील अहेमद (3/43) यांच्याशिवाय भुवनेश्वरकुमारने 2 तर अशोक डिंडा आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. विंडीजची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे दोन्ही सलामीवीर ब्रेथवेट (11) आणि सिमन्स (11) अवघ्या 22 धावांत तंबूत परतले. पॅगोन (06), बोनर (25), कार्टर (35), जॉन्सन (10) यांना मोठी खेळी करता आली नाही. विंडीजने अवघ्या 101 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. या वेळी विंडीजचा डाव 150 च्या आत संपेल, असे वाटत होते. होल्डर 126 च्या स्कोअरवर सातव्या विकेटच्या रुपाने बाद झाला. यानंतर थॉमस आणि परमॉल यांनी आठव्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.
संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडीज अ पहिला डाव 252. (थॉमस 57, परमॉल 66, 3/73 राहुल शर्मा, 3/43 शमीम).