आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India A Beat Australia A By 50 Runs To Win Tri series

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिरंगी मालिकेत भारत अ संघ चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिटोरिया - सलामीवीर शिखर धवन (62) आणि कार्तिकच्या (73) अर्धशतकानंतर शानदार गोलंदाजीच्या बळावर भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघावर 50 धावांनी मात करीत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले.

भारत अ संघाने तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना 243 धावा काढल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाला 46.3 षटकांत 193 धावांत गुंडाळले.

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून एकाही फलंदाज अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्यांच्याकडून सातव्या क्रमांकाचा फलंदाज टीम पेनने सर्वाधिक 47 धावा काढल्या. हॅझवूडने 30 तर फिंचने 20 धावा काढल्या. भारताकडून एस. नदीमने सर्वाधिक 3 गडी बाद केले. मोहंमद सामीने 2 तर रैना, रसूल यांनी प्रत्येकी एकाला बाद केले.

धवन, कार्तिकची मजबूत भागीदारी
भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवनने या सामन्यातही अर्धशतक ठोकले. मात्र, दुसर्‍या टोकाने रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा लवकर बाद झाले. भारतीय संघाने अवघ्या 34 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. नंतर धवन आणि दिनेश कार्तिकच्या अर्धशतकांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी 108 धावांची उपयुक्त भागीदारी केली. संघाच्या 142 धावा झाल्या. हे दोन्ही सेट झालेले खेळाडू बाद झाल्याने भारताचा डाव पुन्हा गडगडला. अंबाती रायडू (34) आणि वृद्धिमान साहा (31) यांनी अखेरच्या षटकात संघर्ष केला. भारताने अखेरच्या पाच विकेट अवघ्या 14 धावांत गमावल्या.