मुंबई - मनोज तिवारीच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने सराव सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडीजचा धुव्वा उडवला. भारताने ९ गड्यांनी सामना जिंकला. उन्मुक्त चंद (७९) आणि करण नायर (२८) यांच्या अभेद्य अर्धशतकी भागीदारीच्या बळावर भारत अ संघाने विजय मिळवला. गोलंदाजीत अमित मिश्रा (३/२६), करण शर्मा (२/२७) यांनीही शानदार कामगिरी केली.
प्रथम फलंदाजी करताना विंडीजला ३८.१ षटकांत अवघ्या १४८ धावांची खेळी करता आली. प्रत्युत्तरात भारत अ संघाने घरच्या मैदानावर शानदार कामगिरी करून अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात २५.३ षटकांत लक्ष्य गाठले.