आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India A Team Made Good Score Against New Zealand

भारत अ संघाचे दिवसअखेर 7 बाद 408 धावांचा मजबूत स्कोअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - मनप्रीत जुनेजाच्या (178*) शानदार शतकाच्या बळावर भारत अ संघाने दुस-या तीनदिवसीय सामन्यात न्यूझीलंड अ संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले. बुधवारी दिवसअखेर भारत अ संघाने 7 बाद 408 धावांचा मजबूत स्कोअर केला. न्यूझीलंडच्या 437 धावांच्या तुलनेत भारतीय संघ अद्याप 29 धावांनी मागे आहे. भारताच्या हाती तीन विकेट शिल्लक आहेत. जुनेजाला प्रथम श्रेणीतील आपल्या नाबाद 201 धावांच्या स्कोअरला मागे टाकण्यासाठी 23 धावांची गरज आहे.


भारताने कालच्या 2 बाद 94 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. जुनेजाने वासुदेवन जगदीशसोबत (91) तिस-या विकेटसाठी 197 धावांची भागीदारी केली. आपले सातवे प्रथम श्रेणी शतक ठोकण्यापासून जगदीशला 9 धावा कमी पडल्या. डग ब्रेसवेलने जगदीशला त्रिफळाचीत करून ही भागीदारी मोडली. जुनेजाने नंतर कर्णधार नायरसोबत चौथ्या विकेटसाठी 88 धावा जोडल्या. कर्णधार अभिषेक नायरने 57 धावांची खेळी करताना अर्धशतक
ठोकले. नायरचा अडथळा ब्रेसवेलनेच दूर केला.