आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारदिवसीय सामना: भारत अ संघाने कॅरेबियन संघाला 268 धावांत गुंडाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुबळी - अभिषेक नायर (4/61) आणि धवल कुलकर्णीच्या (3/60) घातक गोलंदाजीच्या बळावर भारत अ संघाने वेस्ट इंडीज अ संघाला तिस-या चारदिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी 268 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपला त्या वेळी भारत अ संघाने 5 षटकांत बिनबाद 10 धावा काढल्या होत्या. भारत अ संघ मालिकेत 1-0 ने मागे आहे.


व्ही. ए. जगदीश 8 आणि गौतम गंभीर 2 धावांवर खेळत होते. वेगवान गोलंदाज जहीर खानने के्रग ब्रेथवेटला (1) बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. केरोन पॉवेलला (21) धवल कुलकर्णीने त्रिफळाचीत केले. यानंतर लियॉन जॉन्सन आणि नरसिंग देवनारायण यांनी तिस-या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली.


नायरने देवनारायणला (35) बाद करून ही भागीदारी मोडली. जॉन्सनचे शतक (81) हुकले. त्याने संघाकडून सर्वाधिक 81 धावा काढल्या. जॉन्सनने 148 चेंडूचा सामना करताना 15 चौकारांच्या साह्याने ही खेळी साकारली. जॉन्सनला नायरनेच पायचीत केले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी 93 धावांत विंडीजचे 7 गडी बाद केले.


संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज अ संघ पहिला डाव : 268. (जॉन्सन 81, देवनारायण 35, फुदादिन 47, 4/61 नायर, 3/60 धवल कुलकर्णी, 1/33 जहीर खान). भारत अ संघ : बिनबाद 10. (गंभीर नाबाद 02, जगदीश नाबाद 08.)