आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India A Vs South Africa A Second Test Start From Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजयासाठी भारत अ संघ सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिटोरिया- भारतीय अ संघ यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकण्यासाठी सज्ज झाला. भारत व दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यातील चारदिवसीय दुस-या कसोटीला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. यापूर्वी भारतीय अ संघाने पहिली कसोटी डाव व 13 धावांनी जिंकली. यासह चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली.

पहिल्या कसोटीत ईश्वर पांडेने 7 विकेट घेतल्या होत्या. पुजारापाठोपाठ रोहित शर्मा, सुरेश रैनाने शतके झळकवली. दुस-या कसोटीतही चमकदार कामगिरी करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. प्रतिष्ठा जपण्यासाठी आफ्रिका संघ विजयाचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.