आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा आज अफगाणविरुद्ध सराव सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडिया मंगळवारी दुबळा संघ अफगाणिस्तानविरुद्ध सराव सामना खेळेल. स्पर्धेपूर्वी भारताचा हा दुसरा आणि अखेरचा सराव सामना असेल. या सामन्यात विजय मिळवून आत्मविश्वासाने पाकविरुद्ध लढतीला सामोरे जाण्यासाठी टीम इंडियाचे प्रयत्न असेल. यापूर्वी रविवारी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाला होता.

गेल्या दोन महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या टीम इंडियाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. अफगाणविरुद्ध हा विजयाचा दुष्काळ संपेल, अशी आशा आहे.

फॉर्म परत मिळवण्याची संधी :
अफगाणिस्तानविरुद्ध लढतीने टीम इंडियाचा तसा फार फायदा होणार नाही. मात्र, काही फलंदाज आणि गोलंदाजांना आपला फॉर्म परत मिळवण्याची चांगली संधी असेल. गेल्या काही सामन्यांपासून शिखर धवन लयीत नाही. शिवाय मधल्या फळीत विराट कोहली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, कर्णधार धोनी, स्टुअर्ट बिन्नी यांना आपला फॉर्म तपासता येईल.
गोलंदाजी ही आपली दुबळी बाजू आहे. भुवनेश्वर कुमार, मो. शमी, अश्विन, उमेश यादव, मोहित शर्मा या लढतीत फॉर्म परत मिळवून विश्वचषकासाठी तयार होतील, अशी आशा आहे.

दोन्ही संघ असे
अफगाणिस्तान : मो. नबी (कर्णधार), अफसर झझाई, अाफताब आलम, असगर सांताझाई, दौलत झरदान, गुलबदीन नबी, हमीद हसन, जावेद अहमदी, मिरवसी अश्रफ, नजिबुल्ला झरदान, शमिउल्ला शेनवरी.

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, मोहित शर्मा, मो. शमी.