आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहाली- इंग्लंडविरुद्ध चौथ्या एक दिवसीय सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवून मालिका जिंकली आहे. सुरेश रैनाच्या नाबाद 89 आणि रोहित शर्माच्या 83 धावांच्या जोरावर भारताने विजय सहज साकारला. भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली होती. गौतम गंभीर 20 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर विराट कोहली 26 आणि युवराज सिंग 3 धावा काढून परतले. त्यावेळी रोहित शर्माने खंबीरपणे फलंदाजी केली. त्याने 83 धावांची अप्रतिम खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर सुरेश रैनाने डावाची सुत्रे हाती घेतली. धोनीच्या साथीने त्याने 55 धावांची भागीदारी करुन भारताची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. परंतु, 40 व्या षटकात धोनी 19 धावांवर बाद झाला. त्यानंतर जडेजाच्या साथीने रैनाने विजय साकारला. रैनाने 79 चेंडुंमध्ये 89 धावांची बहारदार खेळी केली. त्यात त्याला एक जीवदान मिळाले.
स्टीव्ह फिनच्या गोलंदाजीवर बॅटींग पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवर रैनाने स्लिपमध्ये ऍलिस्टर कुकच्या हाती सोपा झेल दिला. परंतु, फिनचा पाय चेंडू टाकताना स्टंप्सला लागला. त्यामुळे हा चेंडू 'डेड बॉल' ठरला. भारतासाठी हा सामन्यातील महत्त्वाचा क्षण ठरला.
फॉर्मात आलेल्या रोहित शर्माला स्टीव्ह फिनने 83 धावांवर पायचीत केले. रोहित शर्मा कमनशीबी ठरला. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असल्याचे टीव्ही रिप्लेमध्ये दिसले. परंतु, पंचांनी त्याला बाद ठरविले. त्याने 93 चेंडुंमध्ये 1 षटकार आणि 11 चौकारांसह बहारदार खेळी केली. सुरेश रैनासोबत त्याने 51 चेंडुंमध्ये 68 धावांची आक्रमक भागीदारी केली.
गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्याने अपयशी ठरत असलेल्या रोहित शर्माने सलामीला येऊन दमदार अर्धशतक ठोकले. दुस-या बाजुने 3 फलंदाज बाद झाले. तरीही त्याने खंबीरपणे फलंदाजी केली. रोहितने 73 चेंडुंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने जेड ट्रेडवेलला षटकार आणि चौकार ठोकला. जेड ट्रेडवेलनेच युवराज सिंगची तिस-यांदा शिकार केली. ट्रेडवेलला पॅडल स्विप खेळण्याच्या प्रयत्नात युवराज पायचीत झाला. घरच्या मैदानावर युवराज चाचपडत खेळला. त्याने 16 चेंडुंमध्ये केवळ 3 धावा केल्या. यापुर्वीच्या दोन सामन्यांमध्ये तो ट्रेडवेलचा बळी ठरला होता.
ट्रेडवेलनेच भारताला दुसरा धक्का दिला. विराट कोहलीला त्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. विराट कोहली स्थिरावला होता. त्याने रोहित शर्मासोबत दमदार अर्धशतकी भागीदारी केली. परंतु, ट्रेडवेलच्या एका धीम्या चेंडूवर तो फसला. विराटने 26 धावा काढल्या.
भारतीय संघाला डावाच्या सुरुवातीलाच पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. गौतम गंभीरला पंचांनी झेलबाद ठरविले. गंभीरचा फटका चुकला आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. परंतु, पंचांनी त्याला बाद ठरविले. तो 10 धावा काढून परतला. त्यानंतर रोहित शर्मा नशीबवान ठरला. मिडऑफच्या डोक्यावरुन मारलेला रोहितचा फटका फसला. परंतु, पीटरसनने सोपा झेल सोडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.