अहमदाबाद - मोटेरा स्टेडियमवर येत्या गुरुवारी (दि. 6 नोव्हेंबर) रोजी भारत आणि श्रीलंका दरम्यान एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. सामन्यासाठी भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. दोन्ही संघ आज आणि उद्या सराव करणार आहेत. भारताचे विजयी अभियान कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल.
आजपासून इंडियन बँकच्या विविध शाखेमध्ये तिकिट विक्री सुरु झाली आहे. अहमदाबादमध्ये इंडियन बँकेच्या मोटेरा, नवरंगपुरा, ड्राइव इन रोड, नारणपुरा, दक्षिणी सोसायटी, पालडी, अहमदाबाद मुख्य शाखा आणि गांधीनगर सेक्टर- 16 शाखांवर तिकीट विक्री सुरु आहे. तसेच उद्यापासून मोटेरो स्टेडियमवरसुध्दा तिकिट विक्री सुरु होणार आहे. सर्वांत महागडे तिकिट 300 रुपये असून सर्वांत स्वस्त तिकिट 100 रुपये आहे.
तिकिट रेट
अदाणी लोअर पॅव्हेलियन गेट- 2,3, 3000 रू
अदाणी लोअर पॅव्हेलियन गेट- 4. 2500 रू
GMDC ओव्हल पॅव्हेलियन गेट- 13 1500 रू
क्लब पॅव्हेलियन गेट- 5,6 1250 रू
GMDC ओव्हल पॅव्हेलियन गेट- 14 1000 रू
वेस्ट पॅव्हेलियन गेट- 7, 12 800 रू
नोर्थ स्टँड लोअर/अप्पर गेट- 15,17 150 रू
इस्ट स्टँड लोअर/ अप्पर गेड- 18,22 100 रू
पुढील स्लाइडवर पाहा, हॉटेलमध्ये पदार्पन करतना खेळाडूंची छायाचित्रे..