आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Australia 4th Test Started Today At Sidney

विराटची \"कसोटी\', भारत-ऑस्ट्रेलिया आजपासून चौथ्‍या कसोटीला प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - नवे वर्ष, नवीन कर्णधार आणि नव्याने सुरुवात करण्याच्या तिहेरी योगावर ‘विराट ब्रिगेड’ विजयी क्रांतीचा जयजयकार करण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या कसोटीत बाजी मारून यंदाच्या सत्राला दमदार विजयाने सुरुवात करण्याची टीम इंडियाला संधी आहे. ऑस्ट्रेलियाने दोन विजयांसह मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. या दोन्ही संघांतील तिसरी कसोटी अनिर्णीत राहिली.

भारतीय संघ मंगळवारी नव्या नेतृत्वासह नवीन बदलासह सिडनीच्या मैदानावर नावीन्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी उतरणार आहे. फिरकीपटूंसाठी पाेषक मानल्या जाणाऱ्या या मैदानावर भारतीय संघ अक्षर पटेलला पदार्पणाची संधी देण्याची शक्यता आहे. या सामन्यातून युवा गोलंदाज अक्षरला आंतरराष्ट्रीय कसोटीला प्रारंभ करता येईल. त्याला मोहंमद शमीच्या जागी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

जॉन्सनची दुखापत टीम इंडियाच्या पथ्यावर : नवीन वर्षात नव्या अध्यायासाठी सज्ज असलेल्या भारताला चौथ्या कसोटीत विजयाची संधी आहे. यजमानांचा जॉन्सन हा दुखापतीमुळे खेळणार नाही. त्याची दुखापत ही भारतीय संघाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

चांगल्या गोलंदाजीची गरज : चौथा कसोटी सामना जिंकायचा असेल तर फलंदाजीत सातत्य ठेवतानाच २० बळी घेणारी चांगली गोलंदाजीदेखील करावी लागेल. भारतीय गोलंदाजी चांगली होईल, असा विश्वास असल्याचेही कोहलीने नमूद केले.
प्रक्षेपण सकाळी ५.०० वाजेपासून स्टार स्‍पोर्ट्स १, ३ वाहिनीवर
"धोनीइतका शांत होणार'
धोनीच्या निवृत्तीतून संघ अद्याप बाहेर पडला नाही. नूतन कर्णधार विराट कोहली याने मीदेखील धोनीइतका शांत बनून संघाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करेन, असे नमूद केले. धोनीच्या कप्तानपदातच आमची खेळाडूंची कारकीर्द बहरली आहे. त्याने शांत राहून निर्णय घेण्याला प्राधान्य दिले. त्याच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याने आम्ही आत्मसात केल्या.
धोनीला मिळणार संधी ?
महेंद्रसिंग धोनीने नुकतीच कसोटीतून निवृत्ती घेतली. मात्र, त्याने रविवारी संघातील खेळाडूंसोबत नेटवर सराव केला. सध्या संघाचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा बाेटाच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. तसेच त्यानेही सरावात सहभाग घेतला होता. मात्र, त्याचे खेळणेही संदिग्ध मानले जात आहे. त्यामुळे धोनीला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच भुवनेश्वर कुमारनेही नेटवर कसून सराव केला.
आठवणीतला ह्यूज....
सिडनी मैदानावर जगाचा निरोप घेणारा ह्यूज आता कांस्यफलकाने सर्वांच्या आठवणीत राहील.
पुढील स्‍लाइडववर वाचा, चौथ्या कसोटीचे खास आकर्षण