» India-Australia Test : Ashwin And Clark Both Manage Its Own Team

चेन्नई कसोटी : अश्विन व क्लार्क यांनी सांभाळाली आपापल्‍या संघाची बाजू

वृत्तसंस्था | Feb 23, 2013, 07:38 AM IST

  • चेन्नई कसोटी :  अश्विन व क्लार्क यांनी सांभाळाली आपापल्‍या संघाची बाजू

चेन्नई - भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑफस्पिनर आर. अश्विन व मायकेल क्लार्क चमकले. भारताचा फिरकीपटू अश्विनने सहा विकेट घेऊन कांगारू टीमचे कंबरडे मोडले. दुसरीकडे पाहुण्या टीमचा कर्णधार क्लार्कने तेवढ्याच ताकदीने नाबाद शतक ठोकून संघाची बाजू सावरली. 5 बाद 153 धावांच्या संकटात सापडलेल्या संघाला तारण्यासाठी त्याने हेनरिक्ससोबत सहाव्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर सात गडी गमावून 316 धावा काढल्या. क्लार्क (103) व सिडल (1) हे दोघे खेळत आहेत.

दिवसाच्या शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर क्लार्कने चौकार ठोकून शतक पूर्ण केले. भारतासाठी आर. अश्विनने 88 धावा देत सहा बळी घेतले. सकाळी चेपॉक मैदानावर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीस प्रारंभ केला. या वेळी अश्विन चमकदार कामगिरी करेल असे कोणालाही वाटले नव्हते. अनेक क्रिकेट समीक्षकांनी अश्विनला बाहेर बसवून हरभजनला संधी देण्याचा सल्लाही दिला होता.

अश्विनच्या पहिल्या सहा आघातांमुळे कांगारूंची दमछाक झाली होती. संकटाचा सामना करण्यात माहीर असलेल्या क्लार्कने संघाची बाजू सावरली. क्लार्कने 103 धावांच्या खेळीमध्ये 11 चौकार व एक षटकार ठोकला. वॉर्नर (59), हेनरिक्सने (68) अर्धशतकी झळकावले.
चेपॉकच्या खेळपट्टीवर अश्विन बहरला
सहा बळी
पहिला बळी कोवान (29),
दुसरा बळी वॉर्नर (59),
तिसरा बळी ह्यूज (06),
चौथा बळी वॉटसन (28)
पाचवा बळी मॅथ्यू वेड (12),
सहावा बळी हेनरिक्स (68)


आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी
6 बळी वेस्ट इंडीजविरुद्ध, दिल्ली, 2011
5 बळी वेस्ट इंडीजविरुद्ध, मुंबई, 2011
6 बळी न्यूझीलंडविरुद्ध (प. डाव), हैदराबाद, 12
6 बळी न्यूझीलंडविरुद्ध (दु.डाव), हैदराबाद, 12
5 बळी न्यूझीलंडविरुद्ध, बंगळुरू, 2012
6 बळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध,चेन्नई, 2013


प्रज्ञान ओझाची उणीव भासली
भारताला पहिल्या कसोटीत लेट आर्म स्पिनर प्रज्ञान ओझाची उणीव भासली. संघ व्यवस्थापकांनी ओझाला बाहेर बसवण्याचा धक्का देणारा निर्णय घेतला.
7000 धावा मायकेल क्लार्कने कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या.
त्याने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले. त्यांच्या 6996 धावा आहेत.

टॉप ऑस्ट्रेलियन
1. ग्रेग चॅपल 7110
2. डेव्हिड बून 7422
3. मार्क टेलर 7525
4. जस्टिन लेंगर 7696
5. मार्क वॉ 8029
6. मॅथ्यू हेडन 8625
7. स्टीव्ह वॉ 10927
8. अ‍ॅलन बॉर्डर 11174
9. रिकी पाँटिंग 13378
भारताविरुद्ध क्लार्कचे मागील पाच डाव
329*, 18, 210, 37
ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर
103* धावा काढल्या आहेत.

भुवनेश्वर, ईशांतने केली निराशा
वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व भुवनेश्वरकुमारने निराशा केली. या दोघांना एकही बळी मिळवता आला नाही. भुवनेश्वरने 11 षटकांत 48 धावा दिल्या. ईशांतने 11 षटके टाकून 46 धावा दिल्या.
लंचनंतर चार पायचीत
पहिल्या दिवशी लंचनंतर आर. अश्विनच्या चेंडूवर वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड हे तिघेही पायचीत झाले. टी टाइमनंतर अश्विनने हेनरिक्सला पायचीत करून तंबूत पाठवले.
हरभजन सपशेल अपयशी
अनुभवी ऑफस्पिनर हरभजनसिंग शुक्रवारी पहिल्या दिवशी सपशेल अपयशी ठरला. तो आपल्या करिअरमधील 100 वी कसोटी खेळत आहे. मात्र, या कसोटीत त्याला मनासारखी कामगिरी करता आली नाही. त्याने दिवसभरात 19 षटके टाकली. यामध्ये त्याने 71 धावा दिल्या.

Next Article

Recommended