आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्‍टोबरमध्‍ये पुन्‍हा एकदा भिडणार भारत-ऑस्‍ट्रेलिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- यावर्षी ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये टीम इंडिया आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यात पुन्‍हा एकदा सात वनडे सामने आणि एक टी-20 सामने रंगणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी याची घोषणा केली. हे सर्व सामने भारतात होणार आहेत.

ऑस्‍ट्रेलिया टीमचा दौरा दहा ऑक्‍टोबरपासून राजकोटमधील एकमेव टी-20 सामन्‍यापासून होणार आहे. वनडे मालिका 13 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील सातवा आणि शेवटचा सामना दोन नोव्‍हेंबर रोजी बेंगळुरू येथे होईल.

ऑस्‍ट्रेलिया दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

10 ऑक्‍टोबर- टी20 आंतरराष्‍ट्रीय सामना, राजकोट
13 ऑक्‍टोबर- पहिला वनडे, पुणे
16 ऑक्‍टोबर- दुसरा वनडे, जयपूर
19 ऑक्‍टोबर- तिसरा वनडे, मोहाली
23 ऑक्‍टोबर- चौथा वनडे, रांची
26 ऑक्‍टोबर- पाचवा वनडे, कटक
30 ऑक्‍टोबर- सहावा वनडे, नागपूर
2 नोव्‍हेंबर- सातवा वनडे, बेंगळुरू


टी-20 मॅच संध्‍याकाळी सात वाजता सुरू होईल तर सर्व वनडे मॅच दिवस रात्रीचे असतील. या मॅचेस दुपारी अडीच वाजता सुरू होतील.