आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत बांगलादेश तिसरा वन डे अखेर पावसामुळे रद्द, भारताने मालिका 2-0 ने जिंकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - भारत बांगलादेश दरम्यानचा तिसरा व अंतिम वन डे सामना अखेर पावसामुळे रद्द करावा लागला आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-0 ने विजय मिळवला आहे. दुस-या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला आणि आजच्या सामन्यात फलंदाजीचे कौशल्य दाखवणारा स्टुअर्ट बिन्नी मालिकावीर ठरला आहे.
भारताच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 8 धावांत बाद झाले. उथप्पाने 5 तर रहाणेने 3 धावा केल्या. तर अंबाती रायडूही 3 धावांवर बाद झाल्याने भारताला लवकरच तिसरा झटकाही बसला. तर त्याच्या पाठोपाठ आज संधी मिळालेला मनोज तिवारीही केवळ मैदानावर हजेरी लावून 2 धावांत बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था 4 बाद 18 अशी झाली होती. त्यानंतर रैनाने 15 धावा करत धावसंख्या 37 पर्यंत नेली, मात्र बाराव्या षटकात पाऊस आल्याने सामना थांबवण्यात आला. त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर षटके कमी करून सामना सुरू करण्यात आला.
चार गडी लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार रैनाने चांगला खेळ करत आशा जागवल्या होत्या. मात्र रहीमच्या गोलंदाजीवर 25 धावांवर बाद होत त्यानेही सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. त्याच्या पाठोपाठ वृद्धीमान साहादेखिल स्वस्तात बाद झाला. दरम्यान, चेतेश्वर पुजाराने मात्र एक बाजू लावून धरली होती. मात्र तोही 27 धावांवर बाद झाला.
दुस-या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 105 धावांत ढेपाळला होता. तर बांगलादेशचा संघही प्रत्युत्तरात अवघ्या 58 धावांमध्ये गारद झाला होता. त्यामुळे दोन्ही संघ आपल्या फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा सामन्याचे काही PHOTOS