आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिका: कोहलीचे दमदार शतक, भारताचा विंडीजवर \'विराट\' विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्पेन - तिरंगी मालिकेतील करा वा मरा अशा स्थितीत भारताने वेस्‍ट इंडिजला 102 धावांनी हरवून स्‍पर्धेतील आव्‍हान कायम ठेवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 7 बाद 311 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली (102) व शिखर धवनने (69) तिरंगी मालिकेत वेस्ट इंडीजविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी केली. अखेरच्‍या षटकांमध्‍ये मुरली विजय आणि आर. अश्विन यांची चांगली साथ मिळाल्‍यामुळे विराट कोहलीने भारताला 7 बाद 311 अशी धावसंख्‍या गाठून दिली. कर्णधार म्‍हणून विराट कोहलीचा हा पहिलाच विजय आहे.

डावाची सुरुवात करताना भारताच्‍या सलामीवीरांनी सावध फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्माने संघाला 46 धावांचे योगदान दिले. त्‍याने शिखर धवनसोबत दमदार 123 धावांची शतकी सलामी देऊन भक्‍कम पाया रचला. अखेरच्‍या षटकांमध्‍ये विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी केली.

सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा लवकर बाद झाले. परंतु, मुरली विजय आणि आर. अश्विनच्‍या साथीने विराटने भारताला मोठी धावसंख्‍या उभारुन दिली. विराटने डावाच्‍या अखेरच्‍या षटकात शतक पूर्ण केले. त्‍याने 83 चेंडुंमध्‍ये 102 धावांची आक्रमक खेळी केली. त्‍यात 2 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. मुरली विजयने 18 चेंडुंमध्‍ये 27 धावा केल्‍या. तर अश्विनने 18 चेंडुंमध्‍ये 25 धावांची खेळी केली. दोघांसोबत विराटने अनुक्रमे 42 आणि 90 धावांची भागीदारी केली. अश्विनसोबतची भागीदारी कलाटणी देणारी ठरली.

रविंद्र जडेजा बेचाळीसाव्‍या षटकात बाद झाला त्‍यावेळी भारताच्‍या 221 धावा झाल्‍या होत्‍या. त्‍यानंतरच्‍या 8.2 षटकांमध्‍येच विराट आणि अश्विनने तुफानी फलंदाजी करीत 90 धावांची भागीदारी केली.

फोटो- शतक पूर्ण केल्‍यानंतर जल्‍लोष करताना विराट कोहली.