आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Beat Ireland 2 1 In Women's Hockey; Clinch Test Series News In Divya Marathi

भारतीय महिला हॉकी संघाचा मालिका विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेची तयारी करत असलेल्या भारतीय महिला संघाने आयर्लंड दौर्‍यात मालिका विजय मिळवला. आयर्लंडवर 2-1 अशा फरकाने विजय मिळवत भारताने ही कामगिरी केली आहे. सौंदर्या येंदाला आणि सुनीताने प्रत्येकी एक गोल करून संघाचा विजय निश्चित केला. या विजयासह भारतीय महिलांनी यजमानांविरुद्ध तीन सराव सामन्यांची मालिकाही 2-0 ने खिशात घातली. यापूर्वी सलामी सामन्यात भारताने यजमानांवर 3-1 ने मात केली होती.

स्पध्रेच्या सुरूवातीपासूनच जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय महिला संघातील खेळाडूने या सामन्यासुध्दा आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली. सामन्यात सौंदर्या येंदालाने 18 व्या मिनिटाला दणदणीत गोल करून भारताला खाते उघडून दिले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांतच सुनीताने आणखी एक गोल करत भारताच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. दरम्यान, आयर्लंडच्या महिलांनीसुध्दा प्रतिकार करण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र भारताच्या मजबूत संरक्षण फळीसमोर त्यांचा निभाव लागू शकला नाही. मध्यंतरानंतर निकोल इव्हान्सने यजमानांकडून गोल केला. मात्र, भारताने सामना 2-1 ने खिशात घातला.

पुरुष संघाचा पराभव
दुसरीकडे भारतीय पुरुष हॉकी टीमला सराव सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. वर्ल्डकपच्या तयारीसाठी भारतीय संघ दहा दिवसांसाठी हॉलंड दौर्‍यावर आला आहे. या दौर्‍यातील तिसर्‍या सराव सामन्यात भारतीय संघाला यजमान हॉलंडने 4-2 अशा फरकाने पराभूत केले. भारताकडून एस. के. उथप्पा (37 मि.) आणि कर्णधार सरदारा सिंग (40 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. यापूर्वी झालेल्या दोनपैकी एका सराव सामन्यात भारताने विजय मिळवला, तर एक सामना बरोबरीत राहिला. आता तिसर्‍या सामन्यात भारताला यजमानांनी पराभूत करून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.