आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Beat Malaysia 3 2 To Register First Win At Hockey World Cup

भारतीय हॉकी संघ विजयी ट्रॅकवर; हॉलंड उपांत्य फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेग - सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शनिवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेत मलेशियाचा 3-2 ने पराभव केला. यासह भारताने पहिल्या विजयाची नोंद केली. आता भारताचा सामना सोमवारी बलाढय़ ऑस्ट्रेलियाशी होईल.

आकाशदीपसिंग (49, 52 मि.) व जसजितसिंगने (14 मि.) केलेल्या गोलच्या बळावर भारताने सामना जिंकला. मलेशियासाठी रेजी (46मि.) व मरहान (61 मि.) यांनी केलेले गोल व्यर्थ ठरले. यासह भारताने अ गटात पुनरागमन केले. भारताचे गुणतालिकेत चार गुण झाले. हॉलंड संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. या टीमने उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन र्जमनीचा 1-0 अशा फरकाने पराभव केला. या विजयाच्या बळावर हॉलंडने नऊ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी धडक मारली. आता र्जमनीचा सामना मंगळवारी दक्षिण कोरियाशी होणार आहे. दुसरीकडे पराभवामुळे र्जमनी टीम अडचणीत सापडली आहे. हेर्टबेगेरने 19 व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर हॉलंडने सामना जिंकला. या सामन्यातील एकमेव गोल ठरला. दरम्यान, बरोबरीसाठी र्जमनीने केलेले प्रयत्न शेवटपर्यंत अपयशी ठरले.

अर्जेंटिनाची न्यूझीलंडवर मात
पेइल्लाटने केलेल्या तीन गोलच्या बळावर अर्जेंटिनाने न्यूझीलंडचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. त्याने सामन्यात 44, 51 आणि 63 व्या मिनिटाला गोल करून टीमचा विजय निश्चित केला. या विजयासह अर्जेंटिना टीम आता उपांत्य फेरीच्या स्पर्धेत दाखल झाली आहे. न्यूझीलंडसाठी जेन्नेसने 49 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. आता अर्जेंटिना आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी सहा गुण झाले आहेत.

जर्मनीला पराभवाची परतफेड
जर्मनीने 2012 ऑलिम्पिक स्पर्धेच्या फायनलमध्ये हॉलंडचा पराभव केला होता. या अंतिम सामन्यात हॉलंडला नमवून र्जमनीने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. आता याच पराभवाची परतफेड हॉलंडने र्जमनीला केली आहे.