आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Beat Pakistan In 5th World Kabaddi Cup, News In Marathi

पारंपरिक प्रतिस्‍पर्ध्‍याला भारताने चिरडले, हमसून-हमसून रडला पाकिस्‍तानी खेळाडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - पराभवानंतर रडताना पाकिस्‍तानी खेळाडू)
भारताला त्‍यांच्‍याच भूमीत मात देण्‍याचे मनसुभे पा‍क संघाने आखले होते. मात्र, कबड्डीत ‘ढाण्‍या वाघ’ असलेल्‍या भारतीय संघाने पाकला चारीमुंड्या चीत करत त्‍यांची मनसुभे उधळत. पाचव्‍यांदा विश्‍व करंडक कबड्डी स्‍पर्धेच्‍या जगज्‍जेतेपदाचा बहूमान पटकाविला.
श्री मुक्तसर साहिब मधील बादल येथे झालेल्‍या अंतीम सामन्‍यात भारतीय पुरुष कबड्डी संघाने चिर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानला 45-42 ने पराभूत केले. या विजयासह भारताने पाचव्‍या वेळेस विश्‍वविजेतेपदाचा मुकुट आपल्‍याकडेच ठेवला. हा पराभव जिव्‍हारी लागल्‍याने पाकिस्‍तानी खेळाडू हमसून-हमसून रडला.
दुसरीकडे भारतीय महिला कबड्डी संघाने न्यूजीलंडवर 36-27 ने मात देत विश्‍वविजेतपद स्‍वत:कडे राखले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय क्रीडा मंत्री सोनोवाल यांच्या हस्ते भारताच्या दोनन्ही विश्वविजेत्या संघाचा चषक देऊन गौरव करण्यात आला.
संदीप ठरला बेस्ट रेडर
भारताचा संदीप सुरखपुरला बेस्ट रेडर निवडल्‍या गेले. तर पाकिस्‍तानचा शफीक अहमद चिश्ती व भारताचा यादविंद्रा सिंह बेस्ट कॅचर ठरले. विजेत्‍या भारतीय संघाला दोन कोटी रुपयांचा धनादेश देण्‍यात आला. तर उपविजेत्‍या पा‍क संघाला एक कोटी रुपयांचा धनादेश आला.
... आणि रडले पाकिस्‍तानी खेळाडू
भारताला त्‍यांच्‍याच भूमीत मात देण्‍याचे मनसुभे पा‍क संघाने आखले होते. मात्र, कबड्डीत ‘ढाण्‍या वाघ’ असलेल्‍या भारतीय संघाने पाकला चारीमुंड्या चीत करत त्‍यांची मनसुभे उधळत. जगज्‍जेतेपदाचा बहूमान पटकाविला. पराभव जिव्‍हारी लागल्‍याने पाक खेळाडू भावनाविवश होऊन रडले.
पुढील स्लाइड्सवर पाहा रोमांचकारी PHOTOS...