आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताकडून पाकचा धुव्वा, फेड चषक टेनिस स्पर्धा : प्रार्थना, अंकिताचा शानदार विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - नंबर वन अंकिता रैना अाणि अाशियाई चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या प्रार्थना ठाेंबरेने फेड चषक टेनिस स्पर्धेत पाकिस्तान टीमचा धुव्वा उडवला. या दाेन्ही युवा खेळाडूंच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने पाकचा २-० अशा फरकाने पराभव केला.

जगातील नंबर वन दुहेरीची खेळाडू सानिया मिर्झाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला टीम फेड चषकात नशीब अाजमावत अाहे. तिच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या दाेन्ही युवा खेळाडूंनी एकतर्फी विजयाची नाेंद केली. या वेळी भारताची नंबर वन युवा खेळाडू अंकिताने एकेरीच्या सामन्यात बाजी मारून संघाचा एकतर्फी विजय निश्चित केला. तिने पाकच्या उशाना सुहेलचा पराभव केला. अंकिताने ६-०, ६-१ ने विजय संपादन केला.

प्रार्थना चमकली
साेलापूरची युवा खेळाडू प्रार्थना पाकविरुद्ध सामन्यात चमकली. तिने बुधवारी सत्रातील सलामीचा एकेरी सामना जिंकून भारताला दमदार सुरुवात करून दिली. प्रार्थनाने लढतीत सारा मन्सूरचा ६-१, ६-० ने पराभव केला. या वेळी पाकच्या साराने साेलापूरच्या खेळाडूला राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रार्थनाने सरस खेळी करताना सामना अापल्या नावे केला.