आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंकेवर युवकांचीही मात; विजय झोलच्या 43 धावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्बेन - कमल पस्सी (3/34), विकास मिश्रा (2/30) व अपराजीत (2/30) यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने सराव सामन्यात श्रीलंकेवर 33 धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 8 बाद 191 धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 45.5 षटकांत 158 धावांवर गाशा गुंडाळला. या वेळी जयसिंघे याने दिलेली 64 धावांची एकाकी झुंज व्यर्थ ठरली. भारताकडून जालन्याचा विजय झोल (43) व हनुमा विहारी (64) या जोडीने 98 धावांची भागीदारी केली होती.
धावांचा पाठलाग करणा-या श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीचा परेरा (1) व फेर्नाडो (9) ही जोडी स्वस्तात बाद झाली. वाडुगे (33) व जयसिंघे (64) या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविकांत सिंग याने वाडुगेला झेलबाद केले. पिस्सा, अपराजीत या जोडीने लंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. घातक गोलंदाजीसमोर निभाव न लागल्याने लंकेने 158 धावांवर पराभव पत्करला.
तत्पूर्वी, भारताकडून हेरवाडकर (13) व कर्णधार उन्मुक्त चांद (7) हे झटपट बाद झाले. मात्र विजय झोल व विहारी यांनी लंकेच्या गोलंदाजीला फोडून काढत चौथ्या गड्यासाठी शानदार 98 धावांची भागीदारी केली. त्याबळावर भारताने 191 धावा केल्या. संक्षिप्त धावफलक - भारत -8 बाद 191 धावा (विजय झोल 43) वि.वि. श्रीलंका- सर्वबाद 158