डर्बी - इंग्लड दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने डर्बीशायला सराव सामन्यामध्ये पाच विकेटने पराभूत केले. डर्बीशायरने सामन्याच्या तिस-या दिवशी आपला दुसरा खेळ 158 धावांवर घोषित केला होता. यानंतर चौथ्या पारीमध्ये 142 धावांच्या लक्षाचा भारतीय संघाने पाच विकेट गमावत गाठले.
भारताकडून मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी सर्वांधीक अनुक्रमे 41 आणि 39 धावा केल्या. तर
गौतम गंभीर 21 धावांवर नाबाद राहिला. शिखर धवन पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवू शकला नाही. केवळ नऊ धावा काढून तो बाद झाला. याशिवाय रोहित शर्मा 10 आणि वृध्दिमान साहा 19 धावांवर बाद झाला.
डर्बीशायरने आपला पहिला डाव पाच विकेटमध्ये 326 धावांवर घोषीत केला होता. प्रतित्युत्तरादाखल भारताने पहिल्या डावामध्ये 341 धावा बनविल्या होत्या. भारताने जेव्हा पहिला डाव घोषित केला होता तेव्हा बिन्नी 81 धावावर खेळत होता. पहिल्या डावामध्ये चेतेश्वर पुजारा 81धावांवर रिटायर्ड झाला होता. विराट कोहली 36, कर्णधार महेंद्रसिंह धोनी 46 आणि रविंद्र जडेजा 45 धावा केल्या.
इंग्लडकडून बिली गोडलमॅनने दोन्ही पारींमध्ये चांगली खेळी करुन नाबाद 67 आणि नाबाद 56 धावा केल्या. पहिल्या पारीमध्ये वेस डर्स्टनने 95 धावांची आतिशी पारी खेळली होती. भारताकडून भुवनेश्वर कुमारने चांगली गोलंदाजी केली. परंतु डर्बीच्या फलंदाजांसमोर त्याचा चांगलाच कस लागला.