आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्‍लंडवर विजय मिळवून अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताला कांस्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इपोह (मलेशिया) - सामन्यात मागे पडल्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करताना इंग्लंडवर 3-1 ने विजय मिळवत यंदाच्या अझलन शाह हॉकी चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. दुसरीकडे अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला 1-0 ने नमवून न्यूझीलंडने सुवर्णपदक पटकावले.
भारताने सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व राखले. तरीही भारतीय खेळाडूंनी गोल करण्याच्या ब-याच संधी दवडल्या. स्पर्धेपूर्वी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणा-या इंग्लंडला धक्का देऊन भारतीय संघाने तिसरे स्थान पटकावले.
भारताने सामन्यात आक्रमक खेळण्यावर भर दिला. मात्र लढतीचा पहिला गोल करण्याचा मान इंग्लंडने मिळवला. इंग्लंडच्या अ‍ॅश्ले जॅकसनने सामन्याच्या 35 व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. इंग्लंडच्या आघाडीनंतर खचून न जाता भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करीत लढतीत पुनरागमन केले. भारताकडून शिवेंद्रसिंग (42 व्या मिनिटाला), संदीपसिंग (52 व्या मिनिटाला) तर तुषार खांडेकर (69 व्या मिनिटाला) यांनी गोल केले. स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारताला जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडकडून 3-2 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र कांस्यपदकाच्या लढतीत विजय मिळवून भारताने या पराभवाचा वचपा काढला. या सामन्यात प्रशिक्षक मायकेल नोब्सच्या खेळाडूंनी अतिशय रचनाबद्ध खेळ करीत बाजी मारली.
भारताला सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती. सरवनजितसिंगने डाव्या बाजूने फटका मारून शिवेंद्रकडे चेंडू पास केला. मात्र या वेळी भारताच्या या स्ट्रायकरला गोल करता आला नाही. यानंतर सातव्या मिनिटाला शिवेंद्र गोलपोस्टच्या अगदी जवळ उभा असताना एस. व्ही. सुनीलच्या पासवर त्याने गोल करण्याची संधी गमावली. इंग्लंडच्या डॅन फॉक्सने रूपिंदरला अडवल्यामुळे भारताला पहिली पेनॉल्टी कॉर्नरची संधीही मिळाली. मात्र दानिश मुज्तबाला यावर गोल करता आला नाही. यानंतर 15 व्या मिनिटालाही शिवेंद्रला गोल करण्याची चांगली संधी मिळाली. या वेळी त्याला केवळ गोलरक्षकाला चकवायचे होते.
पुढच्या वर्षी रंगणार हॉकी इंडिया लीगचा थरार!
अझलन शाह हॉकी : भारताचा पाकवर 2-1 ने विजय