आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Big Ride Set To Kickoff With Hero Asian Cycling C`ship

‘कोमा’तून ‘ट्रॅक’वर परतला सी. राजेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - ‘कुछ पाना है..कुछ कर दिखाना है...’ असे शब्द साधारणपणे टीव्हीवर ऐकायला मिळतात. मात्र, असे काही लोक आहेत, ज्यांच्या जीवनाचे ध्येयच ही प्रेरणादायी वाक्ये आहेत. अशा गुणवंतांपैकी एक आहे चेन्नईचा युवा सायकलपटू सी. राजेश. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सरावादरम्यान झालेल्या अपघातानंतर सी. राजेश कोमात गेला होता. यानंतर त्याने हार मानली नाही. अखंड इच्छाशक्ती आणि पुढे जाण्याच्या ऊर्मीमुळे आज तंदुरुस्त होऊन तो पुन्हा ट्रॅकवर परतला आहे.
अवघ्या सहा महिन्यांनंतरच राजेशने ट्रॅककडे पावले वळवून सर्वांसाठी एक जिवंत उदाहरण सादर केले.

राजेश 20 फेब्रुवारी 2012 रोजी अपघातात जखमी झाला होता आणि 20 फेब्रुवारी 2013 रोजी तो बेलारूसच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होता. यावरूनच त्याच्या दृढनिश्चयाचा व जिद्दीचा अंदाज बांधला जाऊ शकते. तो आता शुक्रवारी आशियाई सायकलिंग स्पर्धेत 15 किलोमीटर स्नॅच इव्हेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. तो 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येसुद्धा भारतीय संघाचा सदस्य होता.

..हार मानली नाही
20 फेब्रुवारी 2012 रोजी सरावादरम्यान एका गाडीला धडक लागून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे तो कोमात गेला. त्याच्या स्पाइनल कॉडमध्येही दुखापत झाली. मात्र, त्याने हार मानली नाही. दहा दिवसांनंतर तो शुद्धीत आला. मात्र, या दुखापतीमुळे महिनाभर अंथरुणावर पडून होता. 2012 च्या अखेरीस तो पुन्हा ट्रॅकवर सायकलसह परतला.

असे केले पुनरागमन
राजेश सहा महिन्यांनंतर दुखापतीतून सावरला व फिट झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्याच्या वडिलांनी त्याचा सराव घेण्यास सुरुवात केली. दोन आठवडे पॅडलिंगसोबत फिजिओथेरपी आणि जीमच्या मदतीने त्याने आपले स्नायू बळकट केले.

2012 मध्ये राजेशची कामगिरी
पुणे रोड नॅशनल स्पर्धेत एक कांस्यपदक जिंकले
दिल्ली ट्रॅक नॅशनल, तीन रौप्यपदके मिळवली.
एशियन क्लिप कट, दहावे स्थान (यात त्याने आपल्या कारकीर्दीची सर्वश्रेष्ठ 68 वी रँकिंग मिळवली.)
2013 च्या फेब्रुवारीत चंदिगड सायक्लोथॉनमध्ये विजेता
2013 फेब्रुवारीत बेलारूसच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली.